सरत्या वर्षात बरेच सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकले. सागरिका घाटगे- झहीर खानपासून ते विराट कोहली- अनुष्कापर्यंत लग्नसोहळे चांगलेच चर्चेत राहिले, किंबहुना अजूनही त्यांची चर्चा आहे. आता नव्या वर्षात आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. ती अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर.
प्रसिद्ध व्यावसायिक आनंद आहुजा आणि सोनम कपूर यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा काही दिवसांपासून बॉलिवूड विश्वात रंगली होती. मागील तीन वर्षांपासून सोनम आणि आनंद एकमेकांना डेट करत आहेत. नवीन वर्षात हे दोघे लग्न करण्याची चर्चा असून विवाहस्थळदेखील निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे. जोधपूर येथे त्यांचा लग्नसोहळा होणार असून संबंधित विवाहस्थळाची बुकिंगही झाली असल्याची चर्चा आहे.
वाचा : अनुष्कापाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने केले गुपचूप लग्न?
काही दिवसांपूर्वी सोनम आणि आहूजा यांनी लंडनमध्ये एकत्र सुट्टी घालविली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये दोघांच्या प्रेमाच्या चर्चांना उधाण आले. मात्र दोघांनीही प्रेमसंबंधाविषयी जाहीररीत्या खुलासा केला नाही. एवढेचं नव्हे तर सोनम कपूरने आपल्या एका जवळच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी बहिण रिया कपूरसोबत लंडनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी देखील आनंद आहूजा आणि सोनम एकत्र दिसले होते.