कपूर कुटुंबात अखेर त्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या लग्नसोहळ्यापूर्वीच्या समारंभांना कालपासून सुरुवात झाली असून रविवारी मेहंदी कार्यक्रम पार पडला. कपूर आणि अहुजा कुटुंबीयांसोबतच बी-टाऊनमधील बऱ्याच सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात ‘टू बी ब्राईड’ म्हणजेच सोनमच्या चेहऱ्यावरील आनंद सहज पाहायला मिळत होता. सोशल मीडियावर सध्या या कार्यक्रमाचेच फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. सोनम- आनंदच्या धम्माल डान्सचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Photos:  मेहंदी है रचनेवाली

गुलाबी आणि निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनम अत्यंत सुंदर दिसत होती. हातावर मेहंदी काढल्यानंतर डान्स फ्लोअरवर सोनम बिनधास्त थिरकली. यावेळी आनंदनेही तिची साथ दिली. लग्नसोहळ्याचा पुरेपूर आनंद लुटताना या दोघांना पाहिलं गेलं. तर मुलीच्या लग्नसोहळ्यात वडील अनिल कपूर यांचाही ‘झक्कास’ डान्स पाहायला मिळाला.

व्हिडिओ सौजन्य- पिंकविला इन्स्टाग्राम

व्हिडिओ सौजन्य- पिंकविला इन्स्टाग्राम

व्हिडिओ सौजन्य- पिंकविला इन्स्टाग्राम

व्हिडिओ सौजन्य- पिंकविला इन्स्टाग्राम