अभिनेत्री सोनम कपूरचे चाहते तिचा आगामी ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमासाठी फार उत्सुक आहेत. या सिनेमाचे दोन पोस्टर्सही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमधील सोनमचा लूक पाहून या सिनेमातील तिची भूमिका नेमकी काय असेल याच विचारात सध्या तिचे चाहते आहेत. पण तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमीही आहे. सोनमला एका गंभीर आजाराने ग्रासले आहे. हे आम्ही नाही तर खुद्द सोनमनेच कबूल केले आहे. सोनमने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या आजाराबद्दल अधिक माहिती दिली.

पर्यावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे सोनमला श्वास घेण्यास त्रास होत आहे. या आजाराला ब्राँकायटिस असे म्हणतात. सोनमने या आजाराची माहिती तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली. ट्विटमध्ये सोनम म्हणाली की, मला आयुष्यात कधीही श्वसनाचा त्रास झाला नव्हता. पण आता गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मला ब्राँकायटिस हा आजार झाला आहे. हा आजार फार भयंकर आहे.

एवढेच नाही तर अभिनेत्री रिचा चड्ढाच्या पोस्टलाही सोनमने रिट्विट केले आहे. रिचाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले की, कोणाला मुंबईच हवामान दूषित झाल्यासारखं वाटतंय का? गेल्या काही दिवसांपासून मला श्वास घेण्यास अवघड जातंय. असं वाटतंय की आपण पावडर खातोय.
नक्की काय आहे हा ब्राँकायटिस आजार

ब्राँकायटिस दोन प्रकारचा असतो. एक असतो एक्युट यात एक ते तीन आठवडे त्रास होतो. तर तर दुसरा असतो क्रोनिक. यात दोन वर्षांचा कालावधी असतो. यामुळे दरवर्षी कमीत कमी तीन महिने माणूस आजारी राहतो.

Story img Loader