अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सध्या रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांच्यावर सोशल मीडियावर सटकून टीका होत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर रिया आणि महेश भट्ट यांच्यातील स्क्रीनशॉटचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे अनेकांनी रिया आणि महेश भट्ट यांच्यावर टीका केली होती. याप्रकरणी आता महेश भट्ट यांची पत्नी सोनू राजदान यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांतचं घर सोडल्यानंतर रियाने महेश भट्ट यांनी मेसेज केला होता. या दोघांमधील संभाषणाचे काही स्क्रीनशॉट्सही सोशळ मीडियावर व्हायरल झाले होते. यावर महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट आणि पत्नी सोनू राजदान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महेश भट्ट त्यांच्या व्हॉट्सअॅप लिस्टमधील अनेकांना एकाच वेळी सेम मेसेज पाठवतात असं सोनू राजदान म्हणाल्या आहेत.


“९ जून रोजी माझ्या वडिलांनी हे मेसेज मला आणि अन्य किती लोकांना पाठवले माहित नाहीत”, असं ट्विट पूजा भट्टने केलं होतं. तिच्या या वक्तव्याला दुजोरा देत सोनू राजदाननेदेखील तिचे मत व्यक्त केलं आहे. ‘असे मेसेज आम्हाला रोज येतात”, असं सोनी राजदान म्हणाला.

दरम्यान,सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या रिया चक्रवर्तीने ८ जून रोजी सुशांतचं घर सोडलं होतं. घर सोडल्यानंतर रियाने निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांना मेसेज केला होता. सध्या सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयची विशेष टीम करत आहे.