लॉकडाउनच्या काळात गरजुंना सर्वाधिक मदत करणारा सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता सोनू सूद आहे. करोना विषाणूमुळे देशात लॉकडाउन झाला आणि अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं. यात अनेकांवर उपासमारीचीदेखील वेळ आली. परंतु, अभिनेता सोनू सूदने विविध मार्गाने या गरजुंना मदत केली. विशेष म्हणजे अजूनही त्याच्या मदतीचा ओघ थांबलेला नाही. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्याकडे मदत मागत असतात. मात्र, सध्या काही ग्रामस्थांनी सोनू सूदकडे एक अनोखीच मागणी केली आहे.

काही ग्रामस्थांनी सोनू सूदकडे गावातील वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. विशष म्हणजे त्यांच्या या समस्येचं नक्कीच निराकरण करण्याचा प्रयत्न करु असं आश्वासनदेखील सोनूने या नागरिकांना दिलं आहे.

“सोनू सूद सर, आमच्या गावात एका वानराने उच्छाद मांडला आहे. त्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे आमची मनापासून विनंती आहे की या वानराला गावातून बाहेर कुठेतरी दूर जंगलात नेऊन सोडावं”, अशी विनंती या गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

वाचा : पैशांअभावी शस्त्रक्रिया थांबलेल्या चिमुकल्याला सोनू सूदची मदत; ट्विट शेअर करत म्हणाला…

या नागरिकांचं ट्विट पाहिल्यानंतर सोनू सूदनेदेखील मज्जेशीर अंदाजात उत्तर दिलं आहे. “बास, आता फक्त माकडं पकडणंच बाकी होतं. हे सुद्धा करुन पाहू”, असं उत्तर सोनू सूदने दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या ८-९ महिन्यांमध्ये सोनू सूदने अनेकांना मदत केली आहे. अलिकडेच त्याने एका लहान मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केल्याचं पाहायला मिळालं होतं.