‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या माध्यमातून कतरिना कैफ आणि अक्षय कुमार ही जोडी बऱ्याच वर्षांनंतर एकत्र झळकणार आहे. या चित्रपटात ही जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून अक्षय बऱ्याच वेळा सेटवर घडणाऱ्या गोष्टींचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. अलिकडेच अक्षयने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये कतरिना चक्क त्याला झाडूने मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ अक्षयने शेअर केल्यानंतर तो तुफान व्हायरल होत आहे.
अक्षयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कतरिना सेटवर झाडून काढत होती. तिला सेटवर काम करताना पाहून अक्षयनेही तिची खिल्ली उडवली. त्याने लगेच तिचा व्हिडीओ काढायला सुरुवात केली आणि मुद्दाम तिला प्रश्न विचारुन त्रास देऊ लागला. त्याची ही मस्करी पाहून कतरिनानेदेखील त्याला मस्तीमध्ये झाडूने मारलं.
View this post on Instagram
Spotted : The newest #SwachhBharat brand ambassador on the sets of #Sooryavanshi @katrinakaif #BTS
‘कतरिना जी, तुम्ही काय करताय’? असा प्रश्न अक्षयने कतरिनाला विचारला. त्यावर ‘सफाई..साफ सफाई. एक मिनीटं बाजूला व्हा, जरा बाजूला सरका’,असं कतरिना म्हणाली. त्यानंतर ती अचानकपणे त्याला झाडूने मारू लागली. हा व्हिडीओ शेअर करुन अक्षयने त्याला ‘स्पॉटेड: सूर्यवंशी के सेट पर स्वच्छ भारत की नई ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर,’ असं कॅप्शन दिलं आहे.
वाचा : राम गोपाल वर्मा आणि उर्मिलामध्ये होतं ‘हे’ खासं नातं; पण…
दरम्यान, रोहित शेट्टी सूर्यवंशी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून हा चित्रपट २७ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय आणि कतरिनासोबत जॅकी श्रॉफदेखील स्क्रीन शेअर करणार आहेत.