साउथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार धनुष बॉलिवूडमध्ये सुद्धा लोकप्रिय झाला. धनुषने बॉलिवूड आणि साउथ सिनेमाचे महानायक रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिच्याशी लग्नगाठ बांधली. पण ऐश्वर्या रजनीकांत ही वडील आणि पतीसारखं अभिनय तर करत नाही, पण ती उत्तम दिग्दर्शिका आहे. आज धनुषच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला धनुष-ऐश्वर्याची लव्हस्टोरीतील असे काही किस्से सांगणार आहोत जे खूप कमी लोकांना माहित असतील.
अतिशय साध्या लुकने धनुषने साउथ सिनेमामध्ये आपली विशेष ओळख निर्माण केलीय. २००४ मध्ये धनुषने रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिच्याशी लग्न केलं. या दोघांची लव्ह स्टोरी एक चित्रपटापेक्षाही काही कमी नाही. या दोघांची पहिली भेट एका शो दरम्यान झाली होती. एका मुलाखतीत धनुषने त्याची लव्हस्टोरी सांगताना हा खुलासा केला होता. यावेळी तो म्हणाला, “माझा चित्रपट काढाल कोंडे हा रिलीज झाल्यानंतर पहिला शो ठेवण्यात आला होता. त्यावेळी मी माझ्या संपूर्ण कुटूंबासोबत हा शो पाहण्यासाठी गेलो होतो. जेव्हा चित्रपटाचा इंटरव्हल झाला त्यावेळी आम्ही दोघे एकमेकांना भेटलो. आम्ही एकमेकांची गळाभेटही केली होती. कारण चित्रपट रिलीज झाल्यानंतर तो हिट होणार याचा अंदाज आलाच होता.”
View this post on Instagram
चित्रपट संपल्यानंतर सिनेमा हॉलच्या मालकांनी धनुषला रजनीकांत यांच्या मुली सौंदर्या आणि ऐश्वर्या यांची ओळख करून दिली होती. त्यावेळी त्यांनी एकमेकांना केवळ हाय केलं आणि तिथून निघाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच ऐश्वर्याने धनुषला एक बुके पाठवलं आणि त्यावर लिहिलं होतं, “गुड वर्क, कीप इन टच”. त्यावेळी धनुषने ऐश्वर्याच्या त्या म्हणण्याला खूपच गांभिर्याने घेतलं, असं धनुषने त्याच्या मुलाखतीत सांगितलं.
View this post on Instagram
ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. धनुषची बहिण ऐश्वर्याची खूप चांगली मैत्रिण होती. जेव्हा त्या दोघींची गाठभेट होऊ लागली, त्यावेळी सगळ्या मीडियामध्ये धनुष-ऐश्वर्याच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. मीडियामध्ये त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्यामुळे दोघांच्या कुटूंबियांनी घाईघाईने धनुष-ऐश्वर्याच्या लग्नाचा निर्णय घेतला आणि याची घोषणा सुद्धा केली.
View this post on Instagram
खूप कमी लोकांना माहित असेल की ज्यावेळी धनुष-ऐश्वर्याचं लग्न झालं त्यावेळी धनुष केवळ २१ वर्षांचा तर ऐश्वर्या २३ वर्षांची होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण धनुषची स्वतःची इच्छा होती की त्याचं लग्न वयाच्या २३ वर्षाच्या आधीच करावं. या दोघांचा लग्न सोहळा खूपच शानदार पद्धतीने रजनीकांतच्या घरीच पार पडला.