भाऊबहिणीच्या पवित्र नात्याला अधिक घट्ट करणारा धागा म्हणजे ‘राखी’. भाऊबहिणीच्या नात्यावर आधारित असणारा रक्षाबंधन हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होतो. खास रक्षाबंधनाचे औचित्य साधून झी टॉकीज खास चित्रपट सादर करून तमाम प्रेक्षकांसोबत हा सण साजरा करणार आहे.
भावा-बहिणींचे अतूट असणारे नातं अनेक मराठी चित्रपटांच्या कथानकातून प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. राखीच्या रेशमी धाग्याची आणि प्रेक्षकांची वीण घट्ट करून चित्रपटसृष्टीने प्रेक्षकांना मनोरंजनाची राखी बांधली आहे. भावाबहिणीच्या या नात्यावर भाष्य करणारे अनेक चित्रपट गाजले आहेत आणि असेच काही सदाबहार चित्रपट झी टॉकीज ‘तुला जपणार आहे’ चित्रपटात महोत्सवातून आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे.
आणखी वाचा : ११ भागांची भव्यदिव्य मालिका ‘देवा श्री गणेशा’
सोमवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून प्रेक्षक खारी बिस्कीट, एलिझाबेथ एकादशी, माहेरची साडी, आयत्या घरात घरोबा आणि भाऊ माझा पाठीराखा हे चित्रपट पाहू शकतील.