स्वत:च्या कमाईतून विकत घेतलेलं पहिलं घर, पहिली गाडी ही प्रत्येकासाठी खास असते. एक एक रुपया जोडून जेव्हा स्वप्नातलं घर विकत घेतो, तेव्हा त्यातून मिळणारा आनंद हा गगनात मावेनासा असतो. मग ते सामान्य असोत किंवा मग सेलिब्रिटी. अभिनेत्री स्पृहा जोशीने इन्स्टाग्रामवर तिच्या पहिल्या घराचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबतच तिने एक भावनिक पोस्टसुद्धा लिहिली आहे.

‘आम्ही आता राहतो आहोत ते आमचं घर. मी आणि वरदने मिळून घेतलेलं. ‘आमचं’ पहिलं घर. हे घर घेण्याचं ठरवल्यापासून ते इथे शिफ्ट होण्यापर्यंतचा सगळा प्रवास रोमांचक होता. त्यात नोटाबंद झाली. त्यामुळे घेतलेला निर्णय रद्द करावा लागतो की काय असं ही वाटून गेलं. आता एवढा मोठा निर्णय घेणं बरोबर आहे की नाही, हे सगळं आपल्याला झेपेल की नाही असे असंख्य विचार मनात यायचे. पण शेवटी विश्वासाने उडी मारली. जरा मोठीच. बघता बघता या घरात येऊन यंदा दोन वर्ष झालीसुद्धा,’ असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं.

Ganadhipa Sankasthi Chaturthi 2024 date puja muhurat sarvartha siddhi yoga moonrise time and importance of sankashti chaturthi
Sankashti Chaturthi 2024: २७ की २८, एप्रिल महिन्यात कधी आहे संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ
Shani Dev Vakri In Kumbh saturn vakri in Aquarius these three zodiac sign big success in life
३० वर्षांनंतर शनिदेवाची कुंभ राशीत वक्री चाल; ‘या’ राशींना येतील सोन्याचे दिवस? मिळू शकेल बक्कळ पैसा
Actress Amala Paul baby shower in gujarati style
सासरी गुजराती पद्धतीने पार पडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं डोहाळे जेवण, पाच महिन्यांपूर्वी केलंय दुसरं लग्न
kavita medhekar shares emotional memory
“पाच महिन्यांची गरोदर असताना…”, कविता मेढेकरांनी सांगितली भावुक आठवण; म्हणाल्या, “त्या प्रयोगानंतर खूप रडले”

https://www.instagram.com/p/B-dtjWFJ201/

आणखी वाचा : नेहा पेंडसे लग्नापूर्वी या व्यक्तीसोबत होती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये; स्वत:च केला खुलासा 

या जागेबद्दल नेहमी कृतज्ञ वाटतं अशी भावना व्यक्त करत तिने पुढे लिहिलं, ‘अजूनही दर महिन्याचं गणित जमवताना पोटात धडधडतंच आहे. पण रात्री काम पूर्ण झाल्यानंतर या घरातल्या आमच्या रूम मध्ये आलं की तो coziness सगळी टेन्शन्स विरायला लावतो. सकाळी चहा घेत इथल्या खिडकीत बसले की पुढचा दिवस सोपा वाटायला लागतो. ‘आमचं घर’!’

या पोस्टसोबतच स्पृहाने नेटकऱ्यांना एक प्रश्न विचारला. तुम्हाला अशा कोणत्या जागेबद्दल कृतज्ञ वाटतं ते सांगा, असं तिने विचारलंय.