श्रीदेवीच्या करिअरमधील ३०० वा चित्रपट ‘मॉम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रीदेवी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतेय आणि काही मुलाखतीदेखील देत आहे. आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित ‘मॉम’ हा चित्रपट असून अनेक मुलाखतींमध्ये श्रीदेवी तिच्या मुलींविषयीही किस्से चाहत्यांना सांगतेय. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवीने आपली मुलगी जान्हवी कपूरचा एक किस्सा सांगितला. श्रीदेवीच्या चित्रपटांचा जान्हवीवर कशाप्रकारे खोलवर परिणाम झाला हे तिने सांगितले.

‘सदमा’ चित्रपटाबद्दल सांगताना श्रीदेवी म्हणाली, ‘सहा वर्षांची असताना जान्हवीने माझा सदमा चित्रपट पाहिला आणि पुढील तीन दिवस ती माझ्याशी अजिबात बोलली नाही. तू खूप वाईट आई आहेस, त्याच्याशी तू खूप स्वार्थीपणे वागलीस असं ती मला म्हणाली.’ मात्र श्रीदेवीच्या मते ‘सदमा’ हा भावनिक चित्रपट नाही. ‘प्रेक्षकांना हा चित्रपट खूप भावनिक वाटला. एक स्त्री लहान मुलीसारखे वागत असल्याची भूमिका मी साकारली होती. मात्र कमल हसन यांची व्यक्तिरेखा आणि त्यांचं अभिनय खूप भावनिक होतं,’ असं ती सांगते.

News About Sanjay Raut
“संजय राऊत म्हणाले होते आपण सगळे बंड करु, मी..”, एकनाथ शिंदे गटातील नेत्याचा दावा
eknath shinde sanjay raut (1)
“एकनाथ शिंदे म्हणाले, ईडी-सीबीआयवाले माझ्या मागे लागल्यामुळे…”, राऊतांनी सांगितला अयोध्या दौऱ्यातील प्रसंग
Yuvraj Singh Statement on Rohit Sharma
“यशानंतरही रोहित माणूस म्हणून…” युवराज सिंगचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य, रोहितच्या इंग्रजीबद्दल पाहा काय म्हणाला
uddhav thackeray narendra modi narayan rane
“तुम्हाला राजकारणात मुलं होत नाहीत म्हणून…”, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला; कणकवलीतून नारायण राणेंना म्हणाले…
What Modi Said About Uddhav Thackeray ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य चर्चेत, “उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, उद्या…”
balmaifal, story for kids, story of dog and his names, pet dog, dog names, what is in name, dog love, dog story, marathi article, marathi story, marathi story for kids, loksatta balmaifal,
बालमैफल : नावात काय आहे
Eknath shinde and sharad pawar
“मग शरद पवारांवर ही वेळ का आली?” ‘शपथनामा’वरून एकनाथ शिंदेंची बोचरी टीका, म्हणाले…
bachchu kadu devendra fadnavis (२)
फडणवीसांनी तुम्हाला महायुतीतून बाहेर काढलंय? बच्चू कडू म्हणाले, “अमरावतीच्या सभेत त्यांनी…”

वाचा : ‘मॉम’नंतर श्रीदेवी ‘मिस्टर इंडिया २’ साठी सज्ज

‘मॉम’ चित्रपटासाठी अथक प्रयत्न करत असताना पती बोनी कपूरशी तब्बल तीन महिने बोलली नसल्याचेही श्रीदेवीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. ‘गेले तीन महिने मी बोनीजींशी पती म्हणून कधीच संवाद नाही. फक्त सकाळच्या वेळी गुड मॉर्निंग आणि पॅक झाल्यानंतर गुडनाइट बोलायचे. इतकंच काय ते आमचं एकमेकांशी बोलणं व्हायचं,’ असं ती यावेळी म्हणाली.

वाचा : अरुण गवळीमुळे पुढे ढकलली ‘डॅडी’च्या प्रदर्शनाची तारीख

दोन मुलींची आई असल्याने चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी आणि व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी खूप मदत झाल्याचे श्रीदेवी सांगते. चित्रपटात अक्षय खन्ना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही भूमिका आहेत. ‘मॉम’ हा चित्रपट येत्या ७ जुलैला प्रदर्शित होणार आहे.