अभिनेत्री श्रीदेवीसाठी हा महिना सेलिब्रेशनचा आहे असंच म्हणावं लागेल. ५ नोव्हेंबरला तिची मुलगी खुशी कपूरचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी पती बोनी कपूरच्या वाढदिवसासाठीच्या पार्टिचे आयोजन केले. खुशी आणि जान्हवी या श्रीदेवीच्या दोन मुली आणि अभिनेत्री शबाना आझमी, संगीतकार ए. आर. रेहमान, ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाची दिग्दर्शिका गौरी शिंदे, फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासुद्धा पार्टीला उपस्थित होते. या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

श्रीदेवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. चेन्नईमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती आणि या फोटोंमध्ये कपूर कुटुंबियांनी एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण टिपण्यात आले आहेत. खुशी कपूरचाही वाढदिवस तेव्हाच साजरा करण्यात आला.

https://www.instagram.com/p/BbXHBBihtsF/

https://www.instagram.com/p/BbXHRXyBH6A/

वाचा : हॉलिवूडपटात अजिंक्य देवची वर्णी

श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या पदार्पणापूर्वीच तिचा एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणताही कार्यक्रम असो किंवा पार्टी, जान्हवीवर प्रसारमाध्यमांची आणि फोटोग्राफर्सची नजर असतेच. वाढदिवसाच्या या पार्टीतील फोटोंमध्येही कॅज्युअल लूकमध्ये असलेल्या जान्हवीने सर्वांचं लक्ष वेधलं.