बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याने ‘मिस हवाहवाई’ म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवीच्या बर्थडेची जंगी पार्टी आयोजित केलेली. काही दिवसांपूर्वीच श्रीदेवीने ५४वा वाढदिवस साजरा केला. या हरहुन्नरी अभिनेत्रीला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडमधील सर्व बडे सेलिब्रिटी उपस्थित होते.
वाचा : पुण्यात वाजले रियाच्या लग्नाचे सनई- चौघडे
श्रीदेवीच्या बर्थडे बॅशमधील एक खास फोटो स्वतः मनिषने सोशल मीडियावर शेअर केला आहे. बॉलिवूडच्या सर्व दीवा या एकाच फोटोत पाहावयास मिळतात. विद्या बालन, राणी मुखर्जी, ऐश्वर्या राय बच्चन, रेखा, शबाना आझमी आणि टीना अंबानी या सौंदर्यवतींनी बर्थडे पार्टीला उपस्थिती लावली होती. बॉलिवूडच्या या सौंदर्यवर्ती एकत्र येण्याची आणि एकाच फ्रेम दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी राणी आणि ऐश्वर्याचा ग्लॅमरस लूक पाहावयास मिळाला. तर साडीला पसंती दिलेल्या विद्या आणि रेखा या पारंपारिक पोशाखातही एकदम स्टायलिश दिसत होत्या.
वाचा : फ्लॅशबॅक ‘हुकुमत’ पण कोणाची?
At home @karanjohar and me with all these fabulous women . A night to remember pic.twitter.com/lC4Cu2GCH2
— Manish Malhotra (@ManishMalhotra) August 17, 2017
श्रीदेवी आणि मनिष मल्होत्रा यांच्या कुटुंबांमध्ये चांगली मैत्री असल्यामुळेच त्याने बर्थडे पार्टीचे आयोजन केलेले. या पार्टीला निर्माता, दिग्दर्शक करण जोहर हासुद्धा उपस्थित होता. श्रीदेवीच्या कुटुंबाव्यतिरीक्त हुमा कुरेशी, नवाजुद्दीन सिद्दीकी, करण टॅकर, जावेद अख्तर, फराह खान, पुनित मल्होत्रा यांसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
श्रीदेवीला बर्थडेच्या दिवशी (१३ ऑगस्ट) अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिलेल्या. जवळपास १५ वर्षांनंतर श्रीदेवीने गौरी शिंदे हिच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले. २०१३ साली तिला बहुप्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. केवळ चार वर्षांची असल्यापासून चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीने हिंदीसह तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केलेय. ‘मॉम’ या चित्रपटात श्रीदेवी शेवटची झळकलेली.