‘बाहुबली २’ सिनेमा आला आणि प्रभास रातोरात स्टार झाला. तसा तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आधीपासूनच स्टार होता पण भारताच्या इतर भागाला मात्र हा अवलिया फारसा माहित नव्हता. प्रभास सुपरस्टार झाला आणि त्याच्या छोट्यात छोट्या गोष्टी लोकांच्या लक्षात येऊ लागल्या. त्याला काय आवडतं इथपासून तो कुठे फिरायला जातो या सगळ्यावर त्याचे चाहते नजर ठेवू लागले होते. पण आता स्वतः दिग्दर्शक राजामौली यांनी प्रभासचं एक असं सिक्रेट सांगितलं आहे की ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी
प्रभास हा तर खवैय्या आहे हे तर साऱ्यांनाच माहित आहे. पण त्यातही त्याला बिऱ्याणी प्रचंड आवडते. ‘बाहुबली’ सिनेमासाठी त्याने कडक डाएट फॉलो केले होते. एकही दिवस व्यायाम आणि डाएट केल्याशिवाय तो रहायचा नाही. पण तो जात्यात खवैय्या असल्यामुळे महिन्यातून एक दिवस त्याला वाटेल ते खायची सुट असायची. या दिवसासाठीच कदाचित तो २९ दिवस जीवतोड मेहनत घ्यायचा. या एका दिवसांत प्रभास कमीत कमी १५ प्रकारच्या बिर्याणी खायचा. यापैकी अनेक प्रकारच्या बिर्याणीचे नाव सेटवरच्या लोकांना ठाऊकही नसायचे.
एकदा तर असे झाले की, बहिणीच्या नवऱ्याने त्याच्यासाठी सेटवर बिर्याणी आणली होती. पण त्या बिर्याणीसोबत चटणी आणायला ते विसरले. चटणी नसल्यामुळे प्रभासला एवढं वाईट वाटलं की शेवटी त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला रात्री २ वाजता घरी जाऊन ती चटणी आणावी लागली. बहिणीनेही एवढ्या रात्री चटणी बनवली आणि नवऱ्या मार्फत ती भावापर्यंत पोहोचवली. बहिणीने बनवलेली चटणी आल्यानंतरच प्रभास जेवला. त्याच्या या बिर्याणी प्रेमाला तुम्ही काय म्हणणार?
स्पृहा- गश्मीरला काहीच प्रॉब्लेम नाहीये…
प्रभासला खाण्यासोबतच बॉस्केटबॉल आणि फुटबॉल हे खेळही फार आवडतात. आपल्या हैदराबाद येथील घरी त्याने खेळासाठी खास कोर्ट बनवून घेतले आहे. नुकताच प्रभास अमेरिकेवरून एका महिन्याची सुट्टी एन्जॉय करून परतला. ऑगस्टमध्ये तो त्याचा आगामी सिनेमा ‘साहो’च्या चित्रीकरणाला सुरु करणार आहे.