डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य देऊन इटलीत लग्न करणारं जोडपं क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या व्यग्र कामातून थोडासा वेळ काढत एकमेकांना त्यांच्या वेळ दिला होता. त्यानंतर ही जोडी पुन्हा एकदा आपआपल्या कामाकडे वळाले असून अनुष्काने तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणाची तयारी सुरु केली आहे. अनुष्काचा आगामी चित्रपट 'सुई-धागा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सध्या चित्रपटाचं चित्रिकरण सुरु झालं आहे. शरत कटिराय दिग्दर्शित 'सुई-धागा' या चित्रपट यशराज फिल्म्स अंतर्गत चित्रित करण्यात येणार आहे. या चित्रपटमध्ये अनुष्का शर्मा आणि वरुण धवन प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार असून नुकताच या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ वरुण धवनने स्वत: शेअर केला असून सध्या तो तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही कलाकार चित्रिकरण अर्धावर सोडून मक्याचं कणिस खाण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. शाम का programme. Bhuttaa khao mast ho Jao. #suidhaaga made in india A post shared by Varun Dhawan (@varundvn) on Jun 27, 2018 at 6:32am PDT चित्रपटाचं चित्रिकरण सुरु असतानाच अनुष्का आणि वरुण यांनी सेट वरुन अलगद काढता पाय घेत सरळ भाजलेलं मक्याच कणिस विकणाऱ्या गाडीवर हजेरी लावली. यावेळी हे दोघंही चित्रपटातील लूकमध्ये दिसून आले. वरण धवनने हा व्हिडिओ शेअर करत त्याला साजेसं कॅप्शन दिलं आहे. 'सुई -धागा' या चित्रपटामध्ये वरुण धवन एक कपडे विकणारा व्यापारी दाखविला असून अनुष्का शर्मा त्याच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.