बॉलिवूडची ‘हवाहवाई’ श्रीदेवीच्या अभिनय आणि सौंदर्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच. ‘इंग्लिश-विंग्लिश’मधून चित्रपटसृष्टीत तिने पुनरागमन केलं आणि पुन्हा एकदा प्रेक्षक-समीक्षकांकडून तिच्या अभिनयाची भरभरून स्तुती झाली. तिचा आगामी चित्रपट ‘मॉम’ हा कारकिर्दीतील ३०० वा चित्रपट आहे. श्रीदेवीसोबतच तिच्या दोन्ही मुली रुपेरी दुनियेच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरताना दिसत आहेत.

नुकतंच श्रीदेवी तिच्या मुलींना मुंबईतील एका हॉटेलमध्ये डिनरसाठी घेऊन गेली होती. त्यावेळी श्रीदेवीचे खुशी आणि जान्हवीसोबतचे काही फोटो माध्यमांच्या कॅमेरांनी टिपले. फोटोमध्ये श्रीदेवी दोन्ही मुलींच्या मध्ये होती. या फोटोंमधील छोटी मुलगी खुशीची उंची पाहून अनेकांच्याच तोंडात बोट गेली होती. तर चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली होती. आता जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून ‘सैराट’ या सुपरहिट मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून झळकणार आहे. याची निर्मिती करण जोहर करणार असल्यामुळे अनेकांच्या नजरा या आगामी चित्रपटाकडे लागल्या आहेत.

sridevi-janhavi-and-khushi

sridevi-2

वाचा : ‘बॉर्डर’ला २० वर्ष पूर्ण

श्रीदेवी आगामी चित्रपट ‘मॉम’मध्ये भूमिका साकारणार आहे. यामध्ये अक्षय खन्ना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही भूमिका आहेत. ‘मॉम’ हा चित्रपट येत्या ७ जुलैला प्रदर्शित होणार आहे.