मराठी सिनेसृष्टीत आशालता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे करोनामुळे सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. आशालता यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेता सुबोध भावेनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या.

‘प्रदीर्घ काळ स्वतःच्या अभिनयाने संगीत रंगभूमी, चित्रपट आणि मालिका या सर्वच ठिकाणी लीलया काम करणारी आमच्या सर्वांची ‘माँ’, आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या. आशाताई तुला भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो कृपया काळजी घ्या,’ असं सुबोध भावेनं लिहिलं. यावर्षी फेब्रुवारीमध्ये आशालता यांना शेवटचं प्रत्यक्ष भेटलो तेव्हाचा हा फोटो असल्याचं त्याने पोस्टमध्ये सांगितलं.

washing eyes with tap water is a bad habit health news marathi
तुम्हीही झोपेतून उठल्यावर डोळ्यांवर पाणी मारताय? ही सवय ठरू शकते हानिकारक! डॉक्टरांनी दिलाय सल्ला
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले

 

View this post on Instagram

 

प्रदीर्घ काळ स्वतःच्या अभिनयाने संगीत रंगभूमी,चित्रपट आणि मालिका या सर्वच ठिकाणी लीलया काम करणारी आमच्या सर्वांची “माँ” , आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या. आशाताई तुला भावपूर्ण श्रद्धांजली (या वर्षी फेब्रुवारी मध्ये तिला शेवटचं प्रत्यक्ष भेटलो तेव्हाचा हा फोटो) मित्रांनो कृपया काळजी घ्या

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

आशालता या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या शूटिंगसाठी साताऱ्यात आल्या होत्या. याच ठिकाणी त्यांना करोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

आशालतांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे १०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘उंबरठा’, ‘सूत्रधार’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘वहिनीची माया’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. त्या मूळच्या गोव्याच्या असून त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली.