अभिनेता सुबोध भावेचा आज वाढदिवस. यंदाचा वाढदिवस सुबोधसाठी फारच खास आहे. कारण त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे वाढदिवस आणि चित्रपटावर होणारा कौतुकाचा वर्षाव असं डबल सेलिब्रेशन सुबोधसाठी असणार आहे.
‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर बेतलेला आहे. काशिनाथ घाणेकर यांचा उदय आणि अस्त या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. चित्रपट जरी सबकुछ सुबोध भावे असला तरी कलाकारांचं अभिनय, दिग्दर्शन उत्तम झाल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. सोशल मीडियावर सध्या सुबोधवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अप्रतिम सुबोध,, लहानपणी पाहिलेले पण न समजलेले काशिनाथ घाणेकर तु नुसते समजून दाखवले नाहीस तर जिवंत पणे समोर उभे केले. धन्यवाद
— Devendra Mhatre (@DevendraMhatr12) November 8, 2018
Amazing performances by @subodhbhave, prasad Oak, Sumit Raghavan, Anand Ingle.
Ani… Kashinath Ghanekar is a must watch
— Ninad Thakurdesai (@nindu_ninu) November 8, 2018
@subodhbhave just saw the movie! What a great movie!! And you are just unbelievably good.
— mthigale (@mthigale) November 8, 2018
@subodhbhave
Subodh sir biggest thank u 4 starting our new year wid such a gr8 movie.Hats off 2 u and ur team 4 creating a master piece. The kind of performances ur giving I m sure one day a film will cum having title ' Ani Subodh Bhave'— K Avengers ka jabra fan (@Iron_kshitij11) November 8, 2018
@subodhbhave dada khupch uttam kam zal Tuz Ani mala sambhaji khup Awadla khupch shade hota ghanekarancha swabhavache pan Tu partekala nay dilas mazi as I Dr ghanekar chi fan ahe tula he khup awadla Ani theater madhe fackt ek seat khali hoti so Te baghun khupch Chan vatl
— Sapna kolekar (@sapna_kolekar) November 8, 2018
That vibe at Ghanekar Mumbai morning Premier, when you can sense that this film will work its magic….@subodhbhave @Viacom18Movies @Viacom18Marathi
— Ajit Andhare (@AndhareAjit) November 8, 2018
@subodhbhave @prasadoak17 आणि डॉ. काशिनाथ घाणेकर.. मध्यांतरातून ट्विट करतो आहे. एक मिनिट पण नजर हलत नाही. सिनेमा खूप छान आहे.. एक तर तुम्ही सर्व 'अभिनेते' लोक आणि छान दिग्दर्शन… अभिनंदन!!
— Shaunak Kulkarni (@Jamdagni_vats) November 8, 2018
@subodhbhave तुमच्यामुळे.. मोठं नाव असलेली कलाकार मंडळी पहायला आनुभवायला मिळाली.. हेच आमचं भाग्य…. तुम्ही समोर आसता तर कडकडुन मिठी मारली आसती…तुम्ही डॉ. जगलात आम्ही अनुभवतोय…
— Goraksh Chavan (@miGoraksh) November 8, 2018
@Subodhbhave sir movie is 1 no. Ani kashinath ghanekar and ur performance in movie is outstanding.. Ekdam mast sir
— Archana (@Archana83517696) November 8, 2018
या चित्रपटात सुबोधसोबतच सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, आनंद इंगळे, प्रसाद ओक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपट प्रदर्शनापूर्वी सुबोधने ट्विटरवर एक पोल घेतला होता. यंदा दिवाळीत ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ बघणार की ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’, असा प्रश्न त्याने विचारला होता. या पोलमध्ये ७८ टक्के लोकांनी ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला मत दिलं तर २२ टक्के लोकांनी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा पर्याय निवडला होता.