‘द कपिल शर्मा शो’मध्ये विनोदवीर कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या सुमोना चक्रवर्तीला लोक चांगलेच ओळखतात. या शोमधील तिच्या भूमिकेमुळे ती जास्त प्रसिद्धीस आली. मात्र बॉलिवूडच्या चित्रपटांमध्येही ही काम केल्याची माहिती फार कमी लोकांना आहे. सध्या सुमोना एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवरील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती सिगरेट पिताना दिसत होती. अनेक कलाकारांना दारू पिण्याची किंवा सिगारेट ओढण्याची सवय असते. पण असे असले तरी कलाकार शक्यतो कधीही कॅमेरासमोर सिगारेट ओढत नाहीत किंवा तसं कुणाला शूटही करू देत नाही.

सुमोना सेटवर खूप सिगरेट पित असल्याचे म्हटले जाते. सिगरेटसोबतच मद्यपानाचीही तिला सवय आहे. सेटवर दिवसातून ती अनेक सिगरेट ओढत असल्याचं तिच्या सहकलाकारांचं म्हणणं आहे. किंबहुना ती व्यसनाधीन झाल्याचे तिचे सहकलाकार सांगतात.

वाचा : ‘या’ अभिनेत्याची मुलगी शाहिद कपूरला मानत होती पती

२०१२ मध्ये अनुराग बासू यांच्या ‘बर्फी’ चित्रपटात ती पाहुण्या कलाकाराच्या रुपात दिसली होती. याशिवाय सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटात आणि ‘सावधान इंडिया’, ‘क्राईम पॅट्रोल’मध्येही तिने भूमिका साकारली होती. सुमोनाला ‘द कपिल शर्मा शो’मुळे सर्वांत जास्त प्रसिद्धी मिळाली असली तरी ती जवळपास ८ वर्षांपासून टेलिव्हिजन आणि १७ वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करतेय. बालकलाकार असताना आमिर खानच्या ‘मन’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.