बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीच्या चित्रपटाचे फेक पोस्टर शेअर केल्या प्रकरणी बालाजी मीडिया फिल्म्स प्रायवेट लिमिटेड विरोधात सुनीलने तक्रार दाखल केली आहे. या पोस्टरद्वारे आगामी चित्रपटात सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची खोटी माहिती दिली जात होती.

सुनील शेट्टीने बुधवारी वर्सोवा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये सुनील शेट्टीने त्याच्या परवानगी शिवाय बालाजी मीडिया फिल्म्स प्रायवेट लिमिटेडने त्याचा फोटो वापरला असल्याचे म्हटले आहे. तसेच या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारणार असल्याची अफवा पसरवल्या प्रकरणी सुनील शेट्टीने ही तक्रार केली आहे.

एएनआयने ट्विटरद्वारे या संदर्भात माहिती दिली आहे. अभिनेता सुनील शेट्टीने बालाजी मीडिया फिल्म्स प्रायवेट लिमिटेड विरोधात मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये सुनील शेट्टीने त्याच्या परवानगी शिवाय त्याचा फोटो चित्रपटाच्या पोस्टरसाठी वापरला असून त्याचे नाव सोशल मीडियावर वापरले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच कंपनी सुनील शेट्टीचे नाव घेऊन अनेकांकडून पैसे घेत असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करताच ही घटना समोर आली आहे. सुनील शेट्टीने निर्मात्यांवर चित्रपटाचे फेक पोस्टर तयार केल्याचा देखील आरोप केला आहे. तसेच कंपनी इतर लोकांशी संवाद साधून चित्रपटाच्या नावाखाली पैसे उकलण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील सुनील शेट्टीने म्हटले आहे.

Story img Loader