कॉमेडियन सुनील ग्रोवर सध्या वेब सीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने अभिनेता सैफ अली खानच्या ‘तांडव’ या सीरिजमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता तो लवकरच ‘सनफ्लॉवर’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

२ मिनिटे २५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सनफ्लॉवर नावाची सोसायटी दाखवण्यात आली आहे. या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तेथे राहणाऱ्या लोकांचे विचित्र वागणे पाहून पोलिसांना काही तरी गडबड असल्याचे जाणवते. ही मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी आणि मराठमोळे अभिनेते गिरीश कुलकर्णी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. दरम्यान सुनीव ग्रोवरने साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सध्या सोशल मीडियावर या सीरिजचा ट्रेलर चर्चेत आहे.

Video: २१ वर्षांनंतर शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टीने रिक्रिएट केला ‘धडकन’मधील तो सीन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सनफ्लॉवर’ या कॉमेडी थ्रिलर सीरिजचा ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ११ जून २०२१ रोजी ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज प्रेक्षकांना झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये सुनील ग्रोवरसोबत रणवीर शोरे, गिरीश कुलकर्णी, आश्विन कौशल, आशीष विद्यार्थी, शोनाली नागरानी हे कालाकार दिसणार आहेत.