‘गुत्थी’ आणि ‘डॉक्टर मशहूर गुलाटी’ या दोन व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा सुनील ग्रोवर सध्या प्रागमध्ये सुट्टीची मजा घेत आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर मशहूर गुलाटी या व्यक्तिरेखेमध्ये सुनील पुनरागमन करणार असल्याच्या बातमीवरही शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र यावेळी सुनील हा कपिल शर्मासाठी नाही तर सलमान खानसाठी त्या भूमिकेतून पुनरागमन करणार आहे.
दोन तासांच्या या विशेष भागात सुनीलसोबत सलमान खान आपला आगामी चित्रपट ‘ट्युबलाईट’चं प्रमोशन करताना दिसणार आहे. पण त्याआधी सुनील आपली सहकलाकार सुगंधा मिश्रासोबत लाईव्ह शोसाठी प्रागला गेला आहे. आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून सुनील शहराची भ्रमंतीसुद्धा करत आहे. तिथले काही फोटो आणि व्हिडिओ सुनीलने आपल्या चाहत्यांसाठी फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये ‘खूश रेह तू’ असा संदेशसुद्धा सुनीलने दिला आहे.
After Sunset. pic.twitter.com/5sqgGPhEPb
— Sunil Grover (@WhoSunilGrover) June 7, 2017
दरम्यान कपिलला ट्विटरवर एका नेटिझनने प्रश्न केला की, सुनीलला शोमध्ये कधी परत आणणार आहेस? या प्रश्नाला उत्तर देत कपिलने लिहिलं, ‘जेव्हा कधी त्याची इच्छा असेल. मी त्याला किती तरी वेळा परत येण्यास सांगितलं.’ यावरून हेच दिसून येतंय की, आजही सुनीलने शोमध्ये परत यावं अशीच कपिलची इच्छा आहे.
वाचा : अखेर आदिरा आली कॅमेरासमोर
सलमान खानसोबत येणाऱ्या नव्या शोमध्ये सुनील डॉक्टर मशहूर गुलाटीच्या व्यक्तिरेखेत ‘ट्युबलाइट’च्या टीमचं मनोरंजन करताना दिसणार आहे. सोनी वाहिनीने सलमानला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आणण्याऐवजी सुनीलसोबत एक नवा शो बनवण्याचा निर्णय़ घेतला आहे. या कार्यक्रमासोबतच सुनीलच्या पुनरागमनाची प्रतिक्षा आता संपली असून चाहत्यांना पुन्हा एकदा पोट धरून हसण्याची संधी मिळणार आहे हे नक्की.