सोनी टिव्हीवर प्रसारित होणारा बहुचर्चित कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’चा महत्त्वपूर्ण हिस्सा होता. सुनीलने या शोला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. सुनीलने गुत्थी, पिंकी भाभी आणि डॉ. मशहुर गुलाटी अशा व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. या शोमुळे सुनीललाही अगणित प्रसिद्धी मिळाली. यामुळे सुनीलच्या चेहऱ्याला एक वेगळी ओळख मिळाली. पण सुनील काही या शोमधून इंडस्ट्रीमध्ये आला नाही. या शोच्या आधीही त्याने अनेक ठिकाणी काम केले आहे.

पुन्हा एकदा हृतिक-सुझान मुलांसाठी एकत्र

कपिल शर्मासोबत झालेल्या वादानंतर सुनील छोट्या पडद्यापासून थोडा दूर झाला. सुनीलला कपिलच्या शोमध्ये परत आणण्याचे अनेक प्रयत्नही करण्यात आले. पण तो त्या शोमध्ये परत न जाण्याच्या निर्णयावर ठाम राहिला. सुनील याआधी कोण होता आणि त्याने कोणकोणत्या शोमध्ये काम केले हे तुम्हाला माहितेय का? चला तर मग त्याच्या काही माहित नसलेल्या खासगी आणि व्यावसायिक गोष्टी जाणून घेऊया.

अरुण गवळीमुळे ढकलली ‘डॅडी’च्या प्रदर्शनाची तारीख

  • सुनील हरियाणा राज्यातील सिरसा येथील असून त्याने चंदीगढमधील थिएटरमध्ये मास्टर डिग्री घेतली.
  • सुनीलला एक मुलगा असून त्याचे नाव मोहन असं आहे.
  • आज जो सुनील तुम्हाला टेलिव्हिजनवर दिसतोय त्याला सर्वात आधी प्रसिद्ध कॉमेडियन जसपाल भट्टी यांनी कॉलेजमध्ये अभिनय करताना पाहिले होते.
  • सुनीलने एकदा सांगितले होते की, जे विनोद तो व्यासपीठावर करतो ते सर्वात आधी आपल्या पत्नीला ऐकवतो. जर ती हसली तरच तो ते विनोद त्याच्या अॅक्टमध्ये वापरतो, अन्यथा काढून टाकतो.
  • सुनील टिव्हीवर येण्याआधी खूप वर्ष रेडिओवर काम करायचा. ‘रेडिओ मिर्ची’ या एफएम रेडिओ चॅनलवर ‘हंसी के फुव्वारे’ नावाचा शो तो करायचा. या शोमध्ये तो सुदर्शन म्हणजे ‘सुद’ नावाची व्यक्तिरेखा साकारायचा. जुनेच विनोद नव्या स्वरुपात ऐकवण्याच्या त्याच्या कौशल्याचे अनेक चाहते होते.  ‘रेडिओ अॅण्ड टिव्ही अॅडव्हरटायझिंग प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ इंडिया’ने त्याला सर्वात सुंदर आवाजाचा पुरस्कारही दिला होता.
  • सुनीलला पहिला लीड रोड ‘कॉफी विथ डी’ या सिनेमातून मिळाला होता. पण या सिनेमाआधी त्याने ‘प्यार तो होना ही था’, ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’, ‘जिला गाजियाबाद’, ‘फॅमिली’, ‘गब्बर इज बॅक’ आणि ‘बागी’ अशा अनेक सिनेमात छोटेखानी भूमिका साकारल्या आहेत.
  • दुहेरी अर्थ असलेले विनोद सुनीलला फारसे आवडत नाहीत. अगदीच असे काही विनोद सांगण्याची वेळ आली तर त्याला अवघडल्यासारखे होते. यावर बोलताना सुनील म्हणाला होता की, ‘मला दुहेरी अर्थ असलेले विनोद आवडतच नाही. जेव्हा गोष्ट टिव्ही शोची येते तेव्हा तिथे आजी- आजोबांपासून ते लहानग्यांपर्यंत सगळ्या वयोगटातील लोकांचे मनोरंजन करायचे असते.’