बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अ‍ॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर किंवा मग कोणती मुलाखत देत या सगळ्यावर आपलं मत मांडल आहे. दरम्यान, लोकप्रिय कॉमेडियन सुनील पालने देखील एका मुलाखतीत या विषयी चर्चा केली आहे. या चर्चेत त्याने शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि मनोज वाजपेयीवर वक्तव्य केलं आहे.

सुनील पालने फिल्मी न्युजला दिलेल्या मुलाखतीत राजच्या अटकेवर आणि पार्न चित्रपटांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज कुंद्राच्या या प्रकरणात शिल्पा शेट्टीला देखील टार्गेट केले जातं आहे, तर हे बरोबर आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. “कधी कधी असं होतं की आपल्या कुटुंबात कोणी काही चुकीच काम करतं असेल तर कुटुंबातील इतर लोकांना या विषयी काही माहित नसतं. पण हे खूप कमी वेळा पाहायला मिळतं. मात्र, या दोघांमध्ये तर कोणते ही वाद नव्हते, तर या सगळ्याच्या पाठी नक्की कोण आहे. मात्र, कधी कधी कुटुंबातील लोकांना वाटतं की हे जे काही सुरु आहे ते राहू द्या,” असे सुनील म्हणाला.

आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती

पुढे सुनील म्हणाला, “आता काही अभिनेता आणि अभिनेत्री यांना बोल्ड चित्रपटांमध्ये काम करताना वाटतं की आम्ही खूप मोठं काम करत आहोत. पण जेव्हा ते पकडले जातात तेव्हा आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यात शिल्पा देखील सहभागी आहे याची खात्री मी देऊ शकत नाही आणि जर आहे तर मी पुन्हा एकदा बोलेन की अशा पैशांच काय करणार आहात. या पैश्यांमुळे आपलं नाव खराब होतं आणि समाजाचे देखील तुम्ही दोषी होतात. हे तर आतंकवादी सारखेच आहेत. आता जे झालं आहे ते योग्य आहे.”

आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

पुढे मनोज वाजपेयी बद्दल बोलताना तो म्हणाला, “काही मोठे लोक आहेत, जे वेब सीरिजमध्ये सेन्सॉर नसल्याचा फायदा घेतात. अशा वेब सीरिज आहेत ज्या आपण घरी कुटुंबासोबत पाहु शकत नाही. असे ३-४ लोक आहेत ज्यांचा मला प्रचंड राग येतो त्या पैकी एक म्हणजे मनोज वाजपेयी. मनोज वाजपेयी कितीही मोठा अभिनेता किंवा त्याला किती ही पुरस्कार मिळाले तरी तो खूप वाईट माणूस आहे. अशा माणसाला हे राष्ट्रपती पुरस्कार आणि अनेक पुरस्कार देत आहेत. हेच लोक कुटुंबासाठी कशी वेब सीरिज बनवत आहेत. त्यात पत्नी कोणा दुसऱ्यासोबत आहे, तू दुसऱ्या व्यक्तीसोबत आहे, मुलगी लहान असून तिचा बॉयफ्रेंड आहे आणि मुलगा तो तर त्याच्या वयाच्या पुढे आहे, हे काय दाखवत आहेत..असं कुटुंब असतं का? आता लोणावळ्यात काय झालं हे पुढच्या सीझनमध्ये दाखवणार आहेत. काय होणरा हेच सगळं होणार आणि काय..पुढे ते मिर्झापुरचे लोक किती वाईट आहेत. मला ते लोक आवडत नाहीत. या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी आपल्या समाजासाठी चांगल्या नाही. या लोकांच फक्त नाव मोठ आहे आणि काम असं छोटं आहे .त्यांच्यासोबत असं झालचं पाहिजे यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे. कारण काही चांगले कलाकार आहेत. चांगल्या चित्रपटांना थेटर मिळत नाहीत, अशा गलिच्छ चित्रपटांना थेटर मिळतात.