बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची धाकटी लेक रिया कपूरने १४ ऑगस्ट रोजी बॉयफ्रेंड करण बुलानीशी लग्न केले. रिया आणि करण गेल्या १२ वर्षांपासून सोबत आहे. रियाने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. लग्नाच्या जवळपास ६ दिवसांनंतर रियाची आई सुनीता कपूरने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सुनीता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून २ फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये रिया आणि करण दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये अनिल कपूर, सुनीता कपूर, सोनम कपूर, हर्षवर्धन कपूर, आनंद अहूजा, रिया कपूर, करण बुलानी आणि त्याच कुटुंब दिसत आहेत. हे फोटो शेअर करत ‘१४.०८.२०२१..माझी राजकुमारी…आणि माझा मुलगा करणसाठी..जोपर्यंत आपल्या आयुष्यात कोणीतरी येत नाही तो पर्यंत प्रेम हा फक्त एक शब्द असतो. नेहमी असेच प्रेमात रहा..तुमचे आयुष्य हे आनंद आणि प्रेमाने भरले जावो. माझं तुमच्या दोघांवर खूप प्रेम आहे,’ अशा आशयाचे कॅप्शन सुनीता यांनी दिली आहे.

आणखी वाचा : व्हर्जिनिटी ते कार सेक्स; ‘या’ सेलिब्रिटींनी त्यांच्या सेक्स लाईफवर केले होते उघडपणे वक्तव्य

आणखी वाचा : ‘…तर स्वत: ला संपवेन’, करीनाचे ‘ते’ उत्तर बॉलिवूडमध्ये ठरला होता चर्चेचा विषय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनीता यांच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. या आधी रिया आणि अनिल कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत रिया आणि अनिल कपूर हे सोनम कपूरच्या ‘अभी तो पार्टी शुरु हुई है’ या गाण्यावर डान्स करताना दिसले आहेत.