चित्रपट अभिनेता आणि भाजपाचे गुरूदासपुरचे खासदार सनी देओल यांच्याविरोधात सध्या सोशल मीडियावर टीकेची झोड उठताना दिसत आहे. मात्र कोणत्याही वक्तव्यासाठी किंवा भाषणासाठी ही टीका केली जात नसून एका व्हायरल शिफारस पत्रामुळे सनी देओल यांच्यावर टीका केली जात आहे. व्हायरल झालेलं हे पत्र सनी देओल यांच्या अधिकृत सरकारी लेटरहेडवर छापण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की यात टीका होण्यासारखं काय. तर या पत्रामध्ये चक्क एका भाजपाच्या नेत्याच्या मुलीसाठी ऑर्डर करण्यात आलेली थार ही चारचाकी गाडी वेळेत मिळावी यासाठी सनी देओलने शिफारस केल्याचा दावा करण्यात येतोय. हे पत्र सध्या तुफान व्हायरल झालं असून अनेकांनी यासाठी खासदार म्हणून निवडून दिलं आहे का असा प्रश्न उपस्थित केलाय.

पत्रात काय आहे?

व्हायरल झालेल्या पत्रामध्ये विषय हा तातडीने गाडी देण्यात यावी असा आहे. हे पत्र जे एस ग्रोव्हर ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पाठवण्यात आलं असून ही कंपनी पंजाबमधील मामून येथे आहे. दिनेश सिंग ठाकूर यांची मुलगी सुरभी ठाकूर ही माझ्या परिचयाची आहे. तिने तुमच्याकडे महिंद्रा थार एलएक्स एचटी एमटी डिझेल मॉडेल बूल केलं आहे. तिला तुमच्या एजन्सीने २० जानेवारी रोजी २१ हजारांची पावतीही दिली आहे. सुरभीला सध्या गाडीची फार गरज असल्याने तुम्ही तिने बूक केलेली गाडी तिला तातडीने द्यावी अशी मी विनंती करतो, असा मजकूर या पत्रात आहे. हे पत्र १२ फेब्रुवारीचं असलं तरी ते आता व्हायरल झालंय. या पत्रावर सनी देओल हे लोकसभेचे खासदार असल्याचा उल्लेख असून पत्राच्या मथळ्यावर राजमुद्राही आहे.


अनेकांनी हे पत्र व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्यात.

१) लोकसभेतील सनी देओल यांचे कष्ट

२) यासाठी निवडलंय का?

३) योग्य मत दिलं नाही तर काय होतं

४) मला पण मदत करा

५) एका थारसाठी…

६) अपघाती खासदार म्हणता येईल

७) २१ वं शतक

८) फक्त तुम्ही विचार करा…

९) पत्राचा परिणाम

१०) भाजपा आमदाराच्या पोरीसाठी…

११) लोकांच्या अडचणी त्याला ठाऊक नाहीत

१२) अशीही टीका

१३) नकली हात

सध्या या पत्रावर सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरु असली तरी कोणत्याही पक्षाने किंवा सनी देओल यांनी यासंदर्भात कोणताही अधिकृत खुलासा, आरोप-प्रत्यारोप केलेला नाही.