प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या ‘क्वांटिको’ या आंतररराष्ट्रीय टीव्ही मालिकेची पोस्टर्स अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये सर्वत्र झळकलेली पाहून आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना सनी लिओनीने व्यक्त केली आहे. मी नुकतीच लॉस एंजेलिसला आले असून, सर्वत्र तुझीचं पोस्टर्स झळकली असल्याचं प्रियांकाचा उल्लेख करीत टि्वटरवरील आपल्या संदेशात तिने म्हटलं आहे. त्याचबरोबर भारतीय असल्याचा अभिमानदेखील तिने व्यक्त केला आहे. सध्या अमेरिकेत असलेल्या प्रियांकानेसुद्धा सनीचे टि्वटरवरून आभार मानले आहेत. या मालिकेत प्रियांका अॅलेक्स व्हिवर नावाच्या तल्लख पण गूढ एफबीआय प्रशिक्षणार्थिची भूमिका साकारत असून, क्वांटिको तळावर अवतरताच तिचा भूतकाळ उफाळून बाहेर येतो.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2015 रोजी प्रकाशित
प्रियांकाच्या अमेरिकेतील प्रसिद्धीने सनी लिओनी आश्चर्यचकीत
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या ‘क्वांटिको’ या आंतररराष्ट्रीय टीव्ही मालिकेची पोस्टर्स अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये सर्वत्र झळकलेली पाहून आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना सनी लिओनीने व्यक्त केली आहे

First published on: 24-08-2015 at 06:00 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone amazed at priyanka chopras popularity in us