अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर मुलगी निशासोबत सध्या अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. निशाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते अमेरिकेला गेले आहेत. अॅरिझोनामध्ये ‘हॅलो किट्टी’ थीम ठेवत तिचा वाढदिवस साजरा केल्यानंतर निशाला डिस्नेलँडच्या अनोख्या दुनियेची सफर करण्यासाठी घेऊन गेले आहेत.

डिस्नेलँड म्हटलं की लहान मुलाचं आवडतं ठिकाण. या डिस्नेलँडच्या समोर उभं राहून सनीने फोटो काढला आहे. ‘निशाच्या वाढदिवसासाठी आम्ही डिस्नेलँडला गेलो, जिथे सर्वांची स्वप्नं पूर्ण होतात,’ असं कॅप्शन तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोला दिलं आहे. निशाला जगातील प्रत्येक सुख आणि सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न सनी आणि डॅनियल करत आहेत.

वाचा : आता ‘शेमलेस सेल्फी’मुळे ट्रोल झाली ‘दंगल गर्ल’

सनी आणि डॅनियलने या व्हेकेशनचे बरेच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अॅरिझोनामध्ये निशाचा वाढदिवस साजरा करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये मुलीचा वाढदिवस साजरा करतानाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तर फुगे आणि बाहुलीसोबत उभ्या असलेल्या निशाच्या चेहऱ्यावर कुतूहलाचे भाव पाहायला मिळत होते.

काही दिवसांपूर्वीच सनी आणि डॅनियलने निशाला दत्तक घेऊन तिचे पालकत्व स्वीकारले होते. तेव्हा निशा २१ महिन्यांची होती. तिच्या संगोपनातही हे दोघे आता चांगलेच रुळले आहेत.