अभिनेत्री सनी लिओनीचा बायोपिक वेब सीरिज ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. तमिलरॉकर्स Tamilrockers या दाक्षिणात्य चित्रपटांच्या वेबसाइटवर सनीचा बायोपिक लीक झाला आहे. Zee5 वर १६ जुलै रोजी ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. पॉर्नस्टार ते बहुचर्चित बॉलिवूड अभिनेत्री असा सनी लिओनीचा प्रवास तिच्या बायोपिक वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांसाठी तमिलरॉकर्स ही वेबसाइट प्रसिद्ध आहे. याआधी बरेच पायरेटेड वेब सीरिज आणि चित्रपट या साइटवर लीक झाल्याची तक्रार आहे. नुकतीच प्रदर्शित झालेली अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांची ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सीरिजसुद्धा या साइटवर लीक झाली होती. इतकंच नव्हे तर रजनीकांत यांच्या ‘काला’ चित्रपटाचं एचडी व्हर्जन तमिलरॉकर्सवर लीक झालं होतं. या वेबसाइटच्या सदस्यांवर कारवाई करण्यात आली असूनही अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. मार्चमध्ये केरळच्या अँटी पायरसी सेलने या वेबसाइटच्या तीन सदस्यांना अटक केली होती.

Dhadak box office collection day 3: जान्हवी- इशानच्या ‘धडक’ची कमाई सुसाट

स्थानिक पातळीवरून होणाऱ्या पायरसीचा शोध घेण्यातही पोलिसांना अपयश येत असल्याचं वारंवार दिसून आलं आहे. पोलीस यंत्रणाच नव्हे तर सरकारच्या दृष्टीनेही पायरसी रोखणं प्राथमिकता नसल्यानं चित्रपटांना भविष्यातही असाच फटका बसत राहील, अशी प्रतिक्रिया चित्रपटसृष्टीकडून व्यक्त होत आहे.