खेळाची आवड असणाऱ्या अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनी विविध स्पर्धा आणि लीगच्या माध्यमातून क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये पैसे गुंतवले आहेत. अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींनी क्रीडा क्षेत्रात फारसा रस दाखवला होता. अशातच बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ‘प्रीमियर फुटसाल लीग’मध्ये केरळ कोब्राज संघाची सहमालक झाल्याची माहिती समोर येतेय. त्याचप्रमाणे ती या संघाची ब्रँड अॅम्बेसिडरसुद्धा आहे.

‘प्रीमियर फुटसाल लीग’चा दुसरा सिझन १५ सप्टेंबरपासून मुंबईत सुरु होत आहे. याचे काही सामने १७ सप्टेंबरपर्यंत वरळी येथील एनएससीआई येथे खेळले जाणार आहेत. त्यापुढील १९ ते २४ सप्टेंबरपर्यंतचे सामने बंगळुरुच्या कोरमंगला इंडोर स्टेडियममध्ये खेळले जातील. ‘प्रीमियर फुटसाल लीग’च्या माहितीनुसार उपांत्य आणि अंतिम फेरी दुबईमध्ये २६ सप्टेंबरपासून एक ऑक्टोबरपर्यंत खेळले जातील.

वाचा : ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर कर्करोगाने ग्रस्त

यासंदर्भात सनी म्हणाली की, ‘फुटबॉल हा केरळमधील लोकप्रिय खेळ आहे यात काही शंकाच नाही. प्रीमियर फुटसाल लीगचा एक भाग असल्यामुळे मला खूप आनंद वाटत आहे. या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. हेच लक्षात घेऊन मी केरळ कोब्राज संघात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.’

वाचा : म्युझिक कंपन्यांच्या एकाधिकारशाहीवर भडकले ऋषी कपूर

फुटसालच्या पहिल्या सिझनमध्ये पाच संघांचा समावेश होता. या संघांमध्ये लुईस फिगो, रेयान गिग्स, पॉल स्कोल्स, हरनेन क्रेसपो, माइकल सालगाडो, फाल्काओ आणि रोनाल्डिन्हो यांसारखे फुटबॉल क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू सहभागी झाले होते.