काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली होती. सनीने लातूर येथील अनाथाश्रमातून निशाला दत्तक घेतलं होतं. निशाबद्दल सांगताना सनी म्हणाली की, ती कामात कितीही व्यग्र असली तरी निशासाठी ती वेळ काढतेच. अनेकदा सनी निशाला घेऊनच सिनेमाच्या सेटवर जाते. सनी तिच्या दिवसाची सुरूवात निशाचा चेहरा पाहूनच करते. सनीची संपूर्ण सकाळ ही फक्त निशासाठीच असते.

चित्रीकरणाला जाण्यापूर्वी सनी तिचा जास्तीत जास्त वेळ निशासोबत घालवते. मिड-डेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सनी म्हणते की, ‘मी सकाळचा वेळ निशासोबतच असते. चित्रीकरणाला जाण्यापूर्वी आम्ही दोघी खूप खेळतो. तर कधी कधी मी तिला सिनेमाच्या सेटवरही घेऊन जाते. आपल्या मुलांना पाहत राहणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम क्षण आहे.

सनी लिओनी आणि तिचा नवरा डॅनिअल वेबरने निशाला जुलैमध्ये २०१७ मध्ये दत्तक घेतले होते. निशाला लातूरहून मुंबईत आणताचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. निशासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना सनीने लिहिले होते की, निशाही तिच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

डेक्कन क्रोनिकलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सनी म्हणाली होती की, निशाला आम्ही योग्य वेळी सर्व खरं सांगू की तिला दत्तक घेण्यात आले आहे. मुल झाल्यानंतर अनेक पालकांच्या आयुष्यात स्थैर्य आलेलं मी पाहिलं आहे. आमच्याबाबतीत हे थोडं कठीण होत आहे. आमच्यासाठी प्रत्येक दिवस एक नवं आन्हान असतं. पण पालक झाल्यापासून तुमच्यात अनेक सकारात्मक बदल आपोआप होत जातात.