‘एमटीव्ही’वरील प्रसिद्ध शो ‘स्प्लिट्सव्हिला’ नेहमीच विविध कारणांसाठी चर्चेत असतो. या शोच्या प्रत्येक सिझनमध्ये अनेक वादविवाद होतच असतात. यंदाचा दहावा सिझनसुद्धा काही वेगळा नाही. यातील स्पर्धकांना दिल्या जाणाऱ्या आव्हानांमुळे सुरुवातीपासून हा सिझन चर्चेत होता. या शोमध्ये सनी लिओनी नुकतीच एका महिला स्पर्धकावर भडकली. महिलांवरुन टिप्पणी केल्यामुळे सनीचा राग अनावर झाला.

या शोमध्ये स्पर्धकांना काही आव्हानं दिली जातात. दिलेली आव्हानं पूर्ण करणारे स्पर्धक शोमध्ये पुढे जातात. अशाच एका आव्हानादरम्यान रितू आणि रिपू या दोघांमध्ये वाद झाला. ‘तो एका महिलेसारखा वागत असून प्रत्येकाला नकारात्मक वागणूक देत आहे,’ अशी टीका रितूने केली. रितूच्या या वक्तव्यावरुन ‘बेबी डॉल’चा राग अनावर झाला आणि तिने रितूला सुनावलं.

PHOTO : जब काजोल मेट युवराज सिंग

‘महिलेसारखं वागत असल्याची टीका तू त्याच्यावर केलीस, हे योग्य नाही. मी सुद्धा एक स्त्री आहे. आपण सर्व मूर्ख आहोत असा त्याचा अर्थ होतो का? हेच तुला म्हणायचं आहे का? तू सर्व महिलांचा अपमान केला आहेस. आपणच इतरांसाठी उदाहरण ठरतो. अन्य कोणी हे करू शकत नाही.’ असं सनी तिला म्हणाली.

वाचा : ‘तारक मेहता..’च्या सेटवर दयाबेनचा शेवटचा दिवस 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘स्प्लिट्सव्हिला’ या शोचे सूत्रसंचालन सनी आणि रणविजय सिंग हे दोघे मिळून करतात. हा एपिसोड २४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता एमटीव्हीवर प्रसारित होणार आहे.