सनी लिऑन बॉलिवूडमध्ये येऊन स्थिरावली त्याला आता काही काळ लोटला आहे. आयटम साँग ते हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असा प्रवास तिने एकता क पूरसारख्या निर्मातीच्या कृपेने पूर्णही केला. मात्र अजूनही एक चांगली अभिनेत्री म्हणून लौकिक मिळवण्याची तिची धडपड सध्या व्यर्थ ठरली आहे. ‘मस्तीजादे’ या तिच्या आगामी चित्रपटासाठी कपडेपट म्हणून तिला फक्त २७ बिकिनी देण्यात आल्या आहेत.
बॉलिवूडमध्ये चांगली अभिनेत्री म्हणून नाव मिळवण्यासाठी सनी लिऑनची सातत्याने धडपड सुरू आहे. ‘जिस्म २’, ‘रागिणी एमएमएस २’ सारख्या चित्रपटांमधून मध्यवर्ती भूमिका केल्यानंतर ‘आयटम गर्ल’ या प्रतिमेतून बाहेर पडायची इच्छा सनी लिऑनने मुलाखतीतून व्यक्त केली होती. रिअॅलिटी शो आणि निवडक चित्रपटांची वाट पकडत सनीने आपले प्रयत्न सुरू ठेवले असले तरी तिच्याकडे येणारे चित्रपट पाहता अजून तरी तिच्या इच्छेला वाट मिळाल्याचे दिसत नाही. मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘मस्तीजादे’ या चित्रपटात सनी काम करते आहे. अॅडल्ट कॉमेडी असलेल्या या चित्रपटात अभिनेता वीर दास आणि तुषार कपूर तिच्याबरोबर आहेत. या चित्रपटाच्या सेटवर पोहोचलेल्या सनीला पहिल्याच दिवशी तिच्या स्टायलिस्टने धक्का दिला. या संपूर्ण चित्रपटाकरता सनीला दोन ड्रेस, काही शॉर्ट्सच्या जोडय़ा आणि २७ बिकिनी एवढाच कपडेपट देण्यात आला.
चित्रपटाच्या नावावरूनच त्याचा आशय स्पष्ट होत असला तरी संपूर्ण चित्रपटात तिला २७ बिकिनी घालून वावरायचे होते. यासाठी तिला आणखी वजन घटवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याची माहिती तिचा स्टायलिस्ट हितेंद्र कापोपारा याने दिली. हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर सनी सेट सोडून निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर दिग्दर्शक मिलाप झवेरी यांच्यासह तुषार क पूर आणि वीर दास या तिघांनी मिळून सनीची समजूत काढली. अखेर, सनी तयार झाली. तिने वजनही घटवले आणि चित्रिकरणही पूर्ण केले. यानिमित्ताने, बॉलिवूडमध्ये आपल्याच प्रतिमेत अडकलेल्या कलाकारांना विशेषत: अभिनेत्रींनी त्यातून बाहेर पडणे किती अवघड असते, याची प्रचीती येते. सनी लिऑनला तर तिची चांगली अभिनेत्री होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी अजून फार लांबचा पल्ला गाठावा लागणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2015 रोजी प्रकाशित
सनी लिऑनसाठी फक्त २७ बिकिनी
सनी लिऑन बॉलिवूडमध्ये येऊन स्थिरावली त्याला आता काही काळ लोटला आहे.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 08-12-2015 at 08:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone to sizzle in 27 different bikinis in mastizaade