बंगळुरूतील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेत सनी लिओनीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी एक याचिका दाखल केली आहे. ‘टाईम्स क्रिएशन्स’चे मालक एम.एस.हरीश यांची पत्नी एच.एस.भव्या, यांनी ही याचिका दाखल केली आहे. कोणत्याच अधिकृत नोटीसीशिवाय आणि कोणतेच कारण न देता पोलिसांनी सनी लिओनीच्या कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्था देण्यास नकार दिल्यामुळे आयोजकांनी कोर्टात धाव घेतली आहे.

२१ डिसेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे कळत असून त्यानंतर कार्यक्रमाचे भवितव्य ठरणार आहे. तुर्तास सनीने या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटर अकाऊंटवरुन सनीने यासंबंधीची माहिती दिली. पोलिसांनी आपल्या कार्यक्रमात सुरक्षाव्यवस्था पुरवण्यास नकार दिल्यामुळे या कार्यक्रमाला आपण हजर राहणार नसल्याचे तिने सांगितले. स्थानिक पोलिसांनी माझ्या संपूर्ण टीमला आणि त्या कार्यक्रमाला येणाऱ्या चाहत्यांना सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचे नाकारल्यामुळेच आपण हा निर्णय घेत असल्याचे तिने स्पष्ट केले. ‘इतरांच्या सुरक्षिततेचे महत्त्व लक्षात घेत मी या कार्यक्रमला न येण्याचा निर्णय घेते’, असे तिने ट्विटमध्ये सांगितले.

https://twitter.com/fayedsouza/status/943105466120339456

VIDEO : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैरा

नववर्षाच्या पूर्वसंध्येला सनी लिओनीचा कार्यक्रम पार पडला तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन आत्महत्या करतील, असा इशारा काही दिवसांपूर्वी ‘कन्नड रक्षक वेदिके युवा सेने’च्या कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर हा वाद अधिक चिघळल्याचे पाहायल मिळाले. सनीचा कार्यक्रम भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने घातक असल्याचे कन्नड रक्षक वेदिके युवा सेनेचे म्हणणे आहे. सनीने तोकड्या कपड्यांमध्ये परफॉर्म न करता साडी नेसून परफॉर्मन्स दिला तर त्याला आमचा विरोध नसेल, असा पवित्राही संघटनेने घेतला होता.