डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये यावेळी काजोलची आई आणि जेष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी गेस्ट म्हणून उपस्थिती लावलीय. यावेळी तनुजा यांनी स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस चांगलेच एन्जॉय केले. या खास भागात तनुजा यांना एक खास सरप्राइज देण्यात आलं होतं. या सरप्राइजमुळे मात्र तनुजा यांचे डोळे पाणावले.
या एपिसोडच्या प्रोमोमध्ये तनुजा यांच्या सुपरहिट गाण्यांवर स्पर्धकांनी डान्स परफॉर्मन्स सादर केल्याचं पाहायला मिळतंय. स्पर्धकांचे डान्स पाहून तनुजा चांगल्याच आनंदी झाल्या. यावेळी काजोलचा एक व्हिडीओ मेसेज दाखवण्यात आला होता. काजोलचा हा व्हिडीओ पाहून तनुजा यांच्या डोळ्यात मात्र अश्रु तरळले. या व्हिडीओत सुरुवातीला काजोल आणि तिची बहिणी तनिषा मुखर्जी यांचा आई तनुजा सोबतचा एक फोटो दिसतो. त्यानंतर पुढे काजोल म्हणते, ” सर्वात मोठं गिफ्ट माझ्या आईने जे मला दिलं ते म्हणजे चांगली शिकवण आणि संस्कार” काजोलचा हा व्हीडीओ पाहून तनुजा भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय.
View this post on Instagram
हे देखील वाचा: “कुणाशीही कर पण लग्न कर”; तापसी पन्नूच्या आई-वडिलांना सतावतेय ‘या’ गोष्टीची चिंता
तनुजा भावूक झाल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शिट्टी आणि अनुराग बासूने त्यांना आधार दिला. यासोबतच या प्रोमोमध्ये तनुजा यांनी शोमध्ये चांगलीच धमाल केल्याचं पाहायला मिळतंय. एवढचं नाही तर तनुजा यांनी शिल्पा शेट्टीसोबत डान्सवर ठेका देखील धरला.