छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘सुपर डान्सर चॅप्टर ४.’ सध्या या शोमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा परिक्षक म्हणून काम करताना दिसत आहे. लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी मलायका ४७ वर्षांची असून तिला १९ वर्षांचा मुलगा आहे. तिच्या मुलाचे नाव अरहान खान असे आहे. पण एका शोमध्ये मलायकाने पुन्हा आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी सुपर डान्सर या कार्यक्रमातील परिक्षक शिल्पा शेट्टीच्या कुटुंबातील सदस्यांना करोना झाल्यामुळे तिला शोमधून रिप्लेस करण्यात आले होते. शिल्पाच्या जागी मलायका शोमध्ये परिक्षक म्हणून काम करत होती. शोमधील मुलीचा डान्स पाहून ती आनंदी झाली आणि तिने एक मोठा खुलासा केला.

वाचा : वयाने मोठी आणि एका मुलाची आई असलेल्या मलायकाला डेट करण्याबद्दल अर्जुन म्हणाला…

वाचा : ‘श्रीदेवीला घर तोडणारी म्हणत होता, आता स्वत:ने..’ मलायकाला डेट केल्यामुळे अर्जुन झाला होता ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मलायका परिक्षक म्हणून काम करत असताना स्पर्धक अंशिका राजपूतच्या डान्सने इंप्रेस झाली. तिने अंशिकाचे कौतुक करत पुन्हा आई व्हायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली. ‘मला एक मुलगी हवी’ असे मलायका म्हणाली. कारण तिच्या आजूबाजूला सगळे पुरुष आहेत. मुलीची ओढ असल्यामुळे तिच्यासोबत मेकअप, कपडे, शूज शेअर करण्याची इच्छा मलायकाने व्यक्त केली.

मलायकाची इच्छा ऐकून शोमधील परिक्षक गीता कपूर भावूक होते. लवकरात लवकर मलायका एका मुलीची आई होऊ दे असे त्या म्हणाल्या. त्यावर मलायका म्हणाली गीता तुमच्या तोंडात साखर पडो. मला मुलगी होऊ दे किंवा माझी मनापासून इच्छा आहे की मी एका मुलीली दत्त घ्यावे.