पृथ्वीवर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा त्या संकटाचा सामना करण्यासाठी सुपरहिरो पुढे येतात. आपल्या दैवी शक्तिंच्या जोरावर सुपरहिरो त्या संकटाशी दोन हात करतात. सध्या संपूर्ण जगावर करोना विषाणूचे संकट फिरत आहे. या विषाणूने लोकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. त्यामुळे आता या विषाणूला रोखण्यासाठी चक्क सुपरहिरोंची फौज सज्ज झाली आहे.

खरं तर ही एक शॉर्टफिल्म आहे. Saruhan Saral नावाच्या एका विद्यार्थाने या फिल्मची निर्मिती केली आहे. या १२ मिनिटांच्या फिल्ममध्ये आपले आवडते स्पायडरमॅन, सुपरमॅन, आयर्नमॅन, बॅटमॅन, प्लॅश, कॅप्टन अमेरिका, सॉनिक, हल्क असे सर्व सुपरहिरो एकत्र येऊन करोना विषाणूशी झुंज देताना दिसत आहेत. ज्या प्रमाणे आपण एखाद्या बिग बजेट सुपरहिरो चित्रपटात अॅक्शन सीन्स पाहातो तसेच धमाकेदार अॅक्शन सीन्स या या फिल्ममध्ये पाहायला मिळतात. जगभरातील लोकांना करोनाशी लढण्याची प्रेरणा मिळावी यासाठी या फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे असे फिल्मचा निर्माता Saruhan Saral म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या शॉर्टफिल्मचं नाव हिरोज युनायडेट करोना व्हायरस असं आहे. ही फिल्म सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत एक कोटी ७४ लाखांपेक्षा अधिक वेळा ही फिल्म पाहिली गेली आहे.