महाराष्ट्राचे ‘भावगंधर्व’ म्हणून सुप्रसिध्द असलेले आणि आपल्या वडिलांचा थोर वारसा जतन करत आपली वाटचाल सुरु केलेले सुप्रसिध्द संगीतकार, गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली. हृदयनाथ मंगेशकरांनी काही निवडक मराठी आणि हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले असले तरी ते प्रामुख्याने महाराष्ट्राचे ‘भावगंधर्व’ म्हणूनच ओळखले जातात ते त्यांच्या अनेक अनवट चालींनी सजलेल्या गाजलेल्या मान्यवर मराठी कवी आणि गीतकारांच्या कविता आणि गीतांमुळेच. इतकेच नसून हृदयनाथांच्या संगीतात राष्ट्रभक्तीची मोठी जादू आहे. तसेच मराठीतील आद्यकवी आणि संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना त्यांच्या संगीतामुळे मराठी जनसामान्यांच्या ओठी रुळल्या आहेत. जसे की लता दीदींच्या स्वरातील ‘मोगरा फुलला’ हे गाणे.
वाचा : ‘आज काय स्पेशल’ मकरसंकांत विशेषमध्ये शशांक-प्रियांका
मराठी मनाचे भावविश्व अभिरुचिसंपन्न आणि समृद्ध करण्यात पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. प्रतिभासंपन्न गायक आणि संगीत दिग्दर्शक या दोन्ही भूमिका त्यांनी अगदी चोख बजावल्या आहेत. अश्या ज्येष्ठ श्रेष्ठ संगीतकारासमोर त्यांचीच काही निवडक आणि सुप्रसिध्द गाणी सादर करण्याची सुवर्णसंधी सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या स्पर्धकांना मिळाली.
वाचा : अशा प्रकारे केले जाणार ‘आरके’च्या चित्रपटांचे जतन
महेश काळेने ‘मर्म बंधातली ठेव ही’, ‘सुरत पिया कि’ आणि ‘प्रिये पहा हे’ प्रेक्षकांसमोर सादर करताच सगळे मंत्रमुग्ध झाले. तसेच कार्यक्रमातील स्पर्धकांनी देखील पं. हृदयनाथ मंगेशकर यांचीच काही सुप्रसिध्द गाणी गायली. सगळ्याच स्पर्धकांनी गाणी उत्तम पद्धतीने सादर करून आपल्या कॅप्टन्सचे आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे मन जिंकले. पण या आठवड्यात मानाची सुवर्ण कट्यार कुणाला मिळणार हे बघणंही उत्सुकतेचं ठरेल.