भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना आपल्या बायोपिकच्या तयारीत आहे. सुरेश रैनाने नुकत्याच एका लाइव्ह सेशनमध्ये याबद्दलची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी सुरेश रैनाने आपल्या बायोपिकमध्ये साउथ स्टारने मुख्य भूमिका साकारावी अशी इच्छा देखील व्यक्त केली होती. यासाठी त्याने दोन कलाकारांची नावं देखील सुचवली.
सुरेश रैनाचं नुकतच ‘Believe : What Life and Cricket Taught Me’ हे आत्मचरित्र प्रकाशित झालंय. सध्या सुरेश रैना या पुस्तकाचं प्रमोशन करताना दिसतोय. क्रिकेट आणि आयुष्यातील अनुभवातून शिकायला मिळालेल्या गोष्टींचा उलगडा त्याने या पुस्तकात केलाय. सुरेश रैना गेल्या अनेक वर्षांपासून इंडियन प्रीमियरच्या माध्यामातून चेन्नई सुपर किंग्स टीमशी जोडला गेलाय. त्यामुळेच त्याला चेन्नईची अधिक ओढ आहे.
एका लाइव्ह सेशनमध्ये सुरेश रैनाला त्याच्या बायोपिकशी निगडीत काही प्रश्न विचारण्यात आले होते. कोणत्या अभिनेत्याने त्याची व्यक्तीरेखा साकारावी या प्रश्वावर तो म्हणाला, ” साउथमधील अभिनेत्याने माझी भूमिका साकारावी. कारण चेन्नई आणि चेन्नई सुपर किंग्स माझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे ते उत्तमरित्या समजू शकतात. माझ्या डोक्यात दोन तीन नावं आहेत. मला वाटतं सूर्याने माझी व्यक्तीरेखा साकारावी तो ही भूमिका उत्तमपणे साकारू शकतो. शिवाय दुलकर सलमानदेखील एक चांगला अभिनेता आहे. त्याचा अभिनय देखील उत्कृष्ट आहे.” असं म्हणत सुरेशने बॉलिवूडला पाठ फिरवत साउथ हिरोंना बायोपिकसाठी पहिली पसंती दिलीय.
हे देखील वाचा: सलमान खानवर जोरात ओरडल्यानंतर स्वत:च घाबरला होता अभिनेता आदित्य रॉय कपूर
View this post on Instagram
धोनीबरोबरच्या बाँडिंगबद्दल सुरेशने आपल्या पुस्तकात लिहिले आहे. पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी इतरही अनेक रंजक गोष्टी समोर आणल्या आहेत. मी टीम इंडियामध्ये खेळलो, याचे कारण लोकं धोनीला देतात. मात्र, धोनीच्या मैत्रीमुळे मी टीम इंडियामध्ये इतके दिवस खेळलो असं नाही. मी फक्त माझ्या मेहनत आणि कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये खेळू शकलो, असे रैना म्हणाला.