बॉलिवूडचा यशस्वी अभिनेता असा अल्पावधीतच लौकिक मिळवलेल्या सुशांत सिंह राजपूत याने रविवारी आत्महत्या केली.  सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी साडेचार वाजता विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. मात्र सुशांतच्या मृत्यूनंतर आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आगामी प्रोजेक्टसाठी सुशांतने महेश भट्ट यांची भेट घेतली होती. त्याचवेळी सुशांतला भेटलेल्या भट्ट यांच्या सहकारी आणि लेखिका सुहरिता सेनगुप्ता यांनी काही सुशांतचा मानसिक आजार हाताळण्याबाहेर गेला होता असं म्हटलं आहे. मागील काही काळापासून सुशांतची मानसिक स्थिती कशी खालावत गेली यासंदर्भात सुहरिता यांनी माहिती दिली आहे. यासंदर्भातील वृत्त नॅश्नल हेरॉल्ड इंडियाने दिलं आहे.

सुशांत परवीन बाबीच्या मार्गावर गेला

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या

“सडक २ मधील भूमिकेसंदर्भात बोलण्यासाठी सुशांत आणि भट्ट यांची भेट झाली होती. भेटीदरम्यान अवघ्या काही मिनिटांमध्येच दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरु झाल्या. सुशांत खूप बोलका होता. तो अगदी फिजिक्सपासून ते चित्रपटांपर्यंत कोणत्याही विषयांवर सहज बोलायचा,” असं सेनगुप्ता म्हणाल्या. मात्र सुशांतच्या बोलण्यात सतत झळकणारी उदासीनता भट्ट यांच्या नजरेतून सुटली नाही. “सुशांत परवीन बाबीच्या मार्गावर चालला आहे हे त्यांनी ओळखलं. मात्र औषधांशिवाय यावर काहीच उपचार नाही हे ही ठाऊक होतं. निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या सुशांतला बाहेर काढण्याचा प्रयत्न रियाने (चक्रवर्ती) अनेकदा केला. सुशांतने औषध वेळेवर घ्यावीत योग्य उपचार घ्यावेत यासाठी सतत ती त्याच्या मागे लागायची. मात्र त्याने औषधं घेणं बंद केलं होतं,” असंही सेनगुप्ता यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> ट्विटरवरील कव्हर फोटो आणि सुशांतच्या मृत्यूचं कनेक्शन?; आत्महत्येनंतर चर्चेत आलं ‘ते’ चित्र

“आता तो मला मारायला येणार…”

औषधं घेणं बंद केल्याने सुशांतचा मानसिक आजार आणखीन वाढला. “मागील एका वर्षात त्याने बाहेरच्या व्यक्तींशी संपर्क ठेवणं हळूहळू बंद केलं. रियानेही परिस्थिती हाताबाहेर जाईपर्यंत सुशांतला संभाळून घेत त्याच्याबरोबर राहिली. एक काळ तर असा होता की सुशांतला आवाजाचे आणि लोक दिसण्याचे भास होऊ लागले. लोकं आपल्याला मारायला येत आहेत असे भास त्याला होऊ लागले. एक दिवस सुशात आणि रिया सुशांतच्या घरी अनुराग कश्यपचा चित्रपट बघत असतानाच अचानक सुशांतने, मी अनुरागच्या ऑफरला नकार दिला. आता तो मला मारायला येणार, असं काहीतरी बोलू लागला. त्या प्रसंगाचा रियाला मोठा धक्का बसला. रिया सुशांतबरोबर राहण्यास घाबरु लागली. तिच्याकडे पर्यायच उपलब्ध नव्हता. भट्ट यांनी तू काहीही करु शकत नाही असं तिला सांगितलं. तू त्याच्याबरोबर राहिलीस तर तुझ्याही विवेकबुद्धीवर परिणाम होईळ असं त्यांनी तिला सांगितलं. सुशांतच्या बहिणीने येऊन सुशांतची काळजी घेण्यास सुरुवात करेपर्यंत रिया त्याच्या सोबत राहिली. सुशांतची बहिणीनेही त्याला हवा तो सर्व पाठिंबा देण्यास आणि त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली. मात्र तो कोणाचेही काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तो त्याची औषधे घ्यायचा नाही,” असंही सेनगुप्ता यांनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >निव्वळ योगायोग… सुशांत सिंग राजपूत, इरफान खान आणि ‘जोकर’मधील साम्य दाखवणार फोटो व्हायरल

मागील काही महिन्यापासून त्याला प्रचंड मानसिक त्रास होत होता. मात्र त्याने स्वत:ला मानसिक दृष्या कोंडून घेतलं होतं. तो कोणालाही त्याच्या मदतीसाठी त्याच्या जवळ येऊ देत नव्हता. याच मानसिक परिस्थितीमुळे त्याने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.