सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालंय. सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडसह देशभरात मोठी खळबळ माजली होती. सुशांतच्या मृत्यूचं गूढ आजही कामय आहे. सुशांतची आत्महत्या ही हत्या असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारणदेखील चांगलंच तापलं होतं. आजही त्याच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी सीबीआय चौकशी सुरु आहे.

सुशांतला न्याय मिळावा यासाठी त्याचे चाहते आणि कुटुंबीय लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याची मागणी करत आहेत. मुंबई पोलिसांनी सुरू केलाला सुशांतच्या मृत्यूच्या तपासाची सूत्र केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर अनेक चक्र फिरली. अनेक जणांची चौकशी करण्यात आली असली तरी अद्याप सुशांतच्या मृत्यूचं गूढ उकललेलं नाही. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी ड्रग्ज प्रकरण समोर आल्याने हा गुंता अधिक वाढला. त्यामुळे केंद्रीय अमली पदार्थ विभागाने म्हणजेच एनसीबीने देखील चौकशीची सूत्र हाती घेत कारवाई सुरू केली. सुशांतच्या मृत्यूनंतर अशा घडल्या घडामोडी:

d gukesh
अग्रलेख: महाराष्ट्र ‘दीन’!
story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
mumbai crime news, woman suicide mumbai marathi news
मुंबई: दहिसरमध्ये विवाहित महिलेची आत्महत्या, पती व सासूविरोधात गुन्हा दाखल

तो काळा दिवस

१४ जून २०२० या दिवशी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण देश हादरून गेला. सुशांतने १४ जून २०२० सालामध्ये वांद्रे इथल्या त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंर मुंबई पोलिसांनी सुशांतच घर गाठत तपास सुरु केला. सुशांतच्या घरात अशी काही औषधं सापडली ज्यामुळे सुशांत नैराश्यात होता असा अंदाज लावण्यात आला. तर नैराश्य हेच सुशांतच्या आत्महत्येचं कारण असल्याचा कयास पोलिसांनी बांधला.

शेवटचा निरोप

१५ जूनला सुशांतचं संपूर्ण कुटुंब मुंबईत दाखल झाल. तर सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीने रुग्णालयात जाऊन त्याचं अंतिम दर्शन घेतलं. मुसळधार पावसात विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत सुशांतवर अत्यंसंस्कार पार पडले.

पहा फोटो: सुशांत सिंह राजपूतचे शाळा आणि कॉलेजमधील हे खास फोटो पाहिले का?

बॉलिवूडमध्ये वादळ

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये एकच वादळ उठलं. अभिनेत्री कंगना रणौत, शेखर सुमन यांच्यासह अनेक कलाकारांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर बोट ठेवत सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील नेपोटिझम जबाबदार असल्याचा आरोप केला. यावेळी सुशांतच्या कमेंटस् असलेले काही स्क्रीनशॉटस् व्हायरल झाले होते. ज्यात सुशांतने जर त्याचे सिनेमा पाहिले गेले नाही तर तो बॉलिवूड सोडणार असं म्हंटलं होतं.

पंगा गर्ल कंगनाची उडी

तर सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रणौतने या प्रकरणात उडी घेत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर आरोप केले. बॉलिवूडमध्ये बाहेरच्या व्यक्तींना मोठा संघर्ष करवा लागतो. त्यांना करिअरमध्ये पुढे जात असताना अनेक अडथळे निर्माण केले जातात असं म्हणत कंगनाने सुशांतची आत्महत्या म्हणजे बॉलिवूडने केलेला एक खून असल्याचं खळबळजनक विधान केलं होतं.

पहा फोटो: ‘काय पो छे’ ते ‘छिछोरे’ सुशांत सिंह राजपूतच्या करिअरमधील महत्वाच्या भूमिका

रियानेच केली सीबीआय चौकशीची मागणी

सुशांतच्या आत्महत्येनंतर सुशांतची गर्लफ्रेण्ड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची पोलिंसानी चौकशी केली आणि तिचं स्टेटमेन्ट घेतलं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ४० जणांचं स्टेटमेन्ट घेतलं. दरम्यान रियाने तिच्या सोशल मीडियावरून सुशांत संबधीत सर्व पोस्ट डिलीट केल्या. तर १६ जुलैला रियाने एक ट्वीट करत अमित शहा यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली.” सरकारवर मला पूर्ण विश्वास आहे. मी हात जोडून विनंती करते की या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी. कोणत्या दबावामुळे सुशांतने हे पाऊल उचलंल हे मला खरचं जाणून घ्यायचं आहे.” असं रिया तिच्या ट्वीटमध्ये म्हणाली होती.दरम्यान बिहारचे खासदार नीरज कुमार बबलू , भाजपा नेता सुब्रमण्यम स्वामी अशा अनेकांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली

सुशांतच्या वडिलांचे रियावर आरोप

२९ जुलैला सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर आरोप केले. यानंतर या प्रकरणाला वेगळचं वळण आलं. सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात पाटणा इथं गुन्हा दाखल केला. त्यानंतर पाटणा पोलिसांच्या चार सदस्यांची टीम चौकशीसाठी मुंबईत दाखल झाली. यानंतर संशयाची सूई रियाकडे वळू लागली. सुशांतच्या बँक खात्यामधून रियाने मोठी रक्कम काढल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता.

हे देखील वाचा: सुशांत सिंह राजपूतच्या निधनामुळे ‘द फॅमिली मॅन’च्या जेके तळपदेचं स्वप्न राहिलं अपूर्ण

रियाचा व्हिडीओ आणि अंकिताचं वक्तव्य चर्चेत

दरम्यान रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. “देवावर आणि देशाच्या न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मीडियात माझ्याबद्दल अनेक चुकीच्या बातम्या येत आहेत. मी माझ्या वकिलांच्या सांगण्यानुसार काही बोलत नाहीय. सत्यमेव जयते” असं ती या व्हिडीओत म्हणाली होती. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी आणि सुशांतच्या चाहत्यांनी रियाला ट्रोल केलं होतं. तर सुशांतची एक्स गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडेच्या एका वक्तव्यांमुळे मोठी खळबळ माजली होती. सुशांतला रियासोबत रिलेशनशिपमध्ये राहायचं नव्हतं असं सुशांतनेच अंकिताला सांगितल्याचं ती म्हणाली होती.

सीबीआय चौकशी सुरु

केंद्र सरकारने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशीचे आदेश सीबाआयला दिले. त्यानंतर सीबीआयने चौकशीची सूत्र हाती घेतली.

रिया चक्रवर्तीला तुरुंगवास

एनसीबीच्या चौकशी दरम्यान रिया चक्रवर्ती विरोधात ड्रग्ज प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचा मुद्दा समोर आल्यानंतर एनसीबीने कारवाई करत रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकला अटक केली. तसचं बॉलिवूडमधील दीपिका पादूकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर अशा अनेक बड्या स्टार्सची चौकशी केली. तर महिनाभराच्या तुरुंगवासानंतर रियाची जामिनावर सुटका झाली. तर ड्रग्ज प्रकरणातील चौकशीत अनेक जणांना अटक झाली.

हे देखील वाचा: ग्रह-ताऱ्यांची होती आवड आणि महादेवाचा भक्त होता सुशांत सिंह राजपूत

रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक

तर काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणातील सिद्धार्थ हा महत्वाचा व्यक्ती आहे. कारण ज्यावेळी सुशांतने आत्महत्या केली तेव्हा सिद्धार्थ घरात असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान अद्याप सीबीआयने चौकशीचा अहवाल सादर केला नसल्याने सुशांतच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सुशांतच्या कुटुंबाकडून आणि चाहत्यांकडून दबाव आणला जात आहे.