तो आपल्यात नाही यावर अजूनही विश्वास बसत नाहीय. बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं. सुशांतच्या जाण्याचं दु:ख, त्या जखमा ताज्या असतानाच त्याची पहिली पुण्यतिथी आली यावर विश्वास बसणं कठीण झालंय. त्यातच सुशांतच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम आहे. सुशांतने या जगाचा निरोप घेतला असला तरी त्याच्या अभिनयाच्या आणि सिनेमांच्या माध्यमातून तो आजही चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत आहे.सुशांतला ज्याप्रमाणे ग्रह ताऱ्यांची आवड होती. त्याचप्रमाणे सुशांत अत्यंत धार्मिक होता.

सुशांत धार्मिक असून तो महादेवाचा मोठा भक्त होता. सुशांत सिंह राजपूतच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सुशांत धार्मिक असल्याचं लक्षात येतं. आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच २ जून २०२० ला सुशांतने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर महादेव शंकराचा एक फोटो शेअर केला होता. तर कॅप्शनमध्ये त्याने एक शिवमंत्र लिहिला होता.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पहा फोटो: ‘काय पो छे’ ते ‘छिछोरे’ सुशांत सिंह राजपूतच्या करिअरमधील महत्वाच्या भूमिका

पहा फोटो: तोच उत्साह आणि तेच हास्य..; सुशांत सिंह राजपूतचे शाळा आणि कॉलेजमधील हे खास फोटो पाहिले का?

तर सुशांतने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. यात तो महादेवाची पूजा करताना दिसत आहे. ‘जय जय शिव शंभू’ गात तो महादेवाचं स्मरण करत असल्याचं पाहायला मिळतंय. सुशांतला ग्रह-ताऱ्यांची प्रचंड आवड होती. विज्ञानाची आवड असली तरी सुशांत तितकाच धार्मिक होता.

एवढचं नाही तर सुशांतने त्याच्या वाढदिवसदेखील महादेवाच्या भक्तीत लीन होवून साजरा केला होता. २०२० सालामध्ये सुशांतने त्याच्या वाढदिवसाच्या काही पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केल्या होत्या. यात सुशांत आपल्या कुटुंबासोबत महादेवाच्या भक्तीत मग्न असल्याचं दिसून आलं. सुशातं आपल्या अनेक पोस्टमध्ये महादेवाचे मंत्र आणि श्लोक लिहायचा.

Story img Loader