सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सुशांत सिंह यांच्या मृत्यूप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता सुशांतची कथित एक्सगर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने समोर येऊन संपूर्ण प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या परिवाराबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रियानं सुशांत आणि त्याच्या नैराश्याबद्दल उघडपणे वक्तव्य केलं आहे. सुशांत तनावत होता शिवाय त्याची आईही नैराश्यग्रस्त होती असा खुलासा रियानं केला आहे.

रिया म्हणाली की, सुशांत आईच्या खूप जवळ होता. तो नेहमी आईची आठवण काढत असे. सुशांतचे आपल्या वडिलांसबोतचं नातं व्यवस्थित नव्हतं. कारण तरुणपणात वडील सुशांतच्या आईला सोडून गेले होते. रिया असेही म्हणाली की, सुशांतची आई नैराश्यानं त्रस्त होती. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यामुळे जवळपास पाच वर्षे सुशांत वडिलांसोबत बोलत नव्हता.

बिहारच्या पोलीस महासंचालकांना रियाचं उत्तर, म्हणाली….
सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी रिया चक्रवर्तीची लायकी काढली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासंबंधी बोलण्याची रियाची लायकी नसल्याचं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं होतं. यानंतर गुप्तेश्वर पांडे यांच्यावर टीका झाली होती. दरम्यान त्यांच्या वक्तव्यावर रिया चक्रवर्तीने प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत रियाने गुप्तेश्वर पांडे यांचं नाव न घेता उत्तर दिलं आहे. रियाने सुशांतसोबत असणाऱ्या संबंधांमुळे आपण बिहारच्या मुख्यमंत्र्यांनाही प्रश्न विचारु शकतो असं म्हटलं आहे. “कोणीतरी मला माझी लायकी सांगितली आहे. सुशांतवर प्रेम करते हीच माझी लायकी आहे”. पुढे बोलताना तिने म्हटलं आहे की, “कोणी मला विषकन्या म्हणत आहे, कोणी म्हणत मी काळी जादू करते, असं का ? फक्त मी एका अशा व्यक्तीवर प्रेम केलं ज्याला मानसिक आजार होता आणि त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली म्हणून”.

आणखी वाचा 

सुशांतने फ्लॅट घेऊन दिला? आरोप करणाऱ्यांना अंकितानं दाखवला आरसा
‘माझ्यासोबत असताना सुशांत कधीच नैराश्यात नव्हता’; रियाला अंकिताचं सडेतोड उत्तर
मलाही आत्महत्या करावीशी वाटते, मग त्याला जबाबदार कोण असेल ?- रिया चक्रवर्ती
‘आमची पहिली भेट..’; रियाने सांगितली सुशांतसोबतची लव्हस्टोरी