अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पोलीस तक्रार दाखल झाली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे ईडीमार्फत सध्या तिची चौकशी केली जात आहे. दरम्यान अभिनेते शेखर सुमन यांनी रियाच्या अटकेची मागणी पोलिसांकडे केली आहे. त्यांनी संस्कृतमधील एक श्लोक पोस्ट करुन रियाच्या विचारसरणीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरण: स्वरा भास्करचा रिया चक्रवर्तीला पाठिंबा

अवश्य पाहा – Video : मराठीतलं पहिलं देशभक्तीपर रँप साँग पाहिलं ‘का?’

“त्रिया चरित्रं, पुरुषस्य भाग्यम, देवौ ना जानाति कुतो मनुष्य:” असा श्लोक शेखर सुमन यांनी पोस्ट केला आहे. या श्लोकाची निर्मिती महर्षी वेदव्यास यांनी केली होती असं म्हटलं जातं. या श्लोकाच्या सुरुवातीस ‘त्रिया’ असा शब्द आहे. शेखर सुमन यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘त्रिया’ ऐवजी ‘रिया’ असं लिहिलं आहे. स्त्रीचं चरित्र आणि पुरुषाचं भाग्य देवालाही ठावूक नसतं. असा या श्लोकाचा अर्थ आहे. या श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी रिया चक्रवर्तीच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांचं हे अनोखं ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे दोन वेळा रियाची ईडीने चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून तिचे फोन कॉल्स रेकॉर्डदेखील समोर आले आहेत. यात रियाने AU नामक व्यक्तीला सर्वाधिक वेळा फोन केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी AU हे नाव समोर आल्यावर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र AU ही रियाच्या जवळची व्यक्ती असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

रिया आणि AU मध्ये ६३ फोन कॉल्स झाले. AU ही रियाची फॅमेली फ्रेंड असून तिचं नाव अनन्या उधास आहे. परंतु, रिया आणि अनन्यामध्ये इतक्या वेळा फोन का झाले हे अद्याप स्पष्ट न झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, रियाचे फोन कॉल्स रेकॉर्ड तपासल्यावर तिने महेश भट्ट यांनीदेखील फोन केले होते. तसंच तिने वडिलांना सर्वाधिक फोन केल्याचं पाहायला मिळालं.