बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच तुफान व्हायरल झाला. या ट्रेलरनंतर सोशल मीडियावर मोठ्या चर्चा रंगल्या. यातच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी या फिल्मला बायकॉट करण्याची मोहीम सोशल मीडियावर सुरू केलीय.

‘राधे’ या चित्रपटामध्ये सलमानबरोबर अभिनेत्री दिशा पाटणी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली आहे, तेव्हापासून हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आला आहे आणि आता या फिल्मचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर एका दिवसातच युट्यूबवर नंबर १ वर ट्रेंड करतोय. या ट्रेलरला सलमान खानच्या फॅन्सनी तुफान प्रतिसाद दिल्यानंतर आता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या फॅन्सनी चित्रपटाला बायकॉट करण्याची मागणी लावून धरलीय.

ट्विटरवर #BoycottRadhe हा हॅशटॅग ट्रेंडवर आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत सुरू असलेल्या नेपोटीझमचा आरोप करत सुशांतच्या फॅन्सनी या चित्रपटावर आपली नाराजी व्यक्त केलीय . “#RadheTrailer सुरू झाल्यावर तो संपुर्ण न बघता काही सेकंदातच डीसलाईक करणारा जर कोणी असेल तर तो मी आहे.” असं ट्विट एका युजरने केलंय.

आणखी एका फॅनने लिहीलंय, ”सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणातील डिजीटल डेटा नष्ट केला… #BoycottRadheTrailer मुळे सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी गरज पडली तर लोक रस्त्यावरही उतरतील….”

सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी युट्यूबवरही सलमानच्या ‘राधे’ सिनेमाच्या ट्रेलरला डिसलाईक केलं आहे. तसचं इतरांनीही सलमानच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे.


या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, यात सलमान खान एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. यात तो आपल्या शहरातील गुन्हेगारी नष्ट करताना दिसत आहे. या चित्रपटात सलमान राधे या मुख्य भूमिकेत असून त्याने आतापर्यंत 97 एनकाउंटर केले आहेत. यात राधेच्या प्रेमात पडलेल्या जॅकी श्रॉफच्या बहिणीच्या भूमिका दिशाने साकारली आहे. रणदीप हुड्डा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दिशा आणि सलमान ‘भारत’ नंतर पुन्हा एकादा एकत्र काम करताना दिसणार आहेत.

सध्या कोरोना साथीमुळे हा चित्रपट 13 मे रोजी ईदच्या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. थिएटर व्यतिरिक्त प्रेक्षक ‘झी 5’वर ‘पे पर व्हू सेवा ZEEplex सोबतच भारतातील प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म जे ‘झी 5’शी संबंधित, तसेच डिश, डी 2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल हे प्रमुख डीटीएच ऑपरेटर डिजिटलवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.