बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. ‘ड्राइव्ह’ हा त्याच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट ठरला आहे.

‘ड्राइव्ह’ या चित्रपटात सुशांतसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने काम केले. तसेच या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित न करता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीला उतरला नसल्याचे दिसत होते. पण चित्रपट सुशांतच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट ठरला आहे.

Karisma Kapoor saved Harish
सीनच्या शूटिंगदरम्यान पाण्यात बुडणाऱ्या अभिनेत्याचा करिश्मा कपूरने वाचवला होता जीव, ३३ वर्षांनी हरीशने केला खुलासा
main hoon na movie completed 20 years interesting facts
‘मै हूँ ना’ चित्रपटाची २० वर्षे : तब्बूचा काही सेकंदाचा कॅमिओ ते गौरी खानची पहिली निर्मिती, जाणून घ्या न ऐकलेले किस्से
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा

सुशांतचा ‘छिछोरे’ हा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट अखेरचा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात अपयशाने खचून आत्महत्या करण्याऱ्या मुलांना अपयशाने खचून न जाता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून कसे बघायचे हे सुशांतने सांगितले होते. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर त्याच्यासोबत दिसली होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल २९.७८ कोटी रुपयांची कमाई केली होती.

सुशांतने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.