बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता दिड महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई पोलीस, बिहार पोलीस अन् आता सीबीआय या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परिणामी संतापलेल्या चाहत्यांनी सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी ‘जस्टिस फॉर सुशांत’ असं एक कॅम्पेनच सुरु केलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हे कॅम्पेन आता केवळ भारतापूरतं मर्यादित राहिलेलं नाही. तर थेट अमेरिकेत देखील सुशांतचे मोठमोठे होर्डिंग्स पाहायला मिळत आहेत. या होर्डिंग्सचे फोटो अन् व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
View this post on Instagram
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये ‘जस्टिस फॉर सुशांत’चे मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. या होर्डिंग्सद्वारे सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी केली जात आहे. या होर्डिंग्सचे फोटो आणि व्हिडीओज सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. “सुशांतला न्याय मिळवून देण्याची मागणी आता केवळ भारतापूरती मर्यादित न राहता त्याला विश्वव्यापी स्वरुप प्राप्त झालं आहे.” असं कॅप्शन तिने या पोस्टवर लिहिलं आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सुशांत मृत्यू प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेले १० महत्त्वाचे मुद्दे
१. सुशांत मृत्यू प्रकरणी आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे.
२. सुशांत दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं उघडकीस आलं आहे.
३. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासाचा विषय आहे.
४. १६ जून रोजी सुशांतचे वडील, बहीण आणि मेहुण्याचा जबाब नोंदवला गेला.
५. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी आमच्या तपासाबद्दल कोणतीच शंका उपस्थित केली नव्हती. आमच्या तपासात काही त्रुटी असल्याची तक्रारसुद्धा त्यांनी केली नव्हती.
६. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे.
७. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावलं गेलं.
८. ती आता कोठे आहे, याबाबत मी वक्तव्य करू शकत नाही.
९. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले.
१०. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत, असं आमच्या तपासात निदर्शनास आलं. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अजून तपास सुरू आहे.