देशभरामध्ये रंक्षाबंधनाचा खास सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण म्हणजे नात्याचा गोडवा जपणारा दिवस. या खास दिवशी बहीण भावाला राखी बांधून भावाच्या दिर्घाआयुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ बहिणीची आयुष्यभर रक्षा करण्याचं वचन देतो. आजच्या या खास दिवशी दिंवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूची बहीण श्वेता सिंहने आपल्या भावाच्या आठवणीत एक खास फोटो शेअर केलाय.
सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुशांतसोबतचा एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुशांत आणि श्वेता हातात हात घेऊन उभे असल्याचं पाहायला मिळतंय. दोघेही मनसोक्त हसत आहेत. हा फोटो शेअर करत श्वेताने एक भावूक पोस्ट लिहिली आहे. ” लव्ह यू भाई, आपण कायम एकत्र असू” असं श्वेता कॅप्शनमध्ये म्हणाली. याआधी कधीही न पाहिलेला सुशांतचा हा फोटो पाहून चाहते देखील भावूक झाले आहेत.
View this post on Instagram
सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कायम सुशांतचे जुने फोटो शेअर करत असते. गेल्या वर्षीदेखील श्वेताने सुशांतच्या फोटोंचं एक कोलाज शेअर केलं होतं.
View this post on Instagram
१४ जुलै २०२० सालामध्ये सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतने अचानक आत्महत्या केल्याने बॉलिवूडसह देशभरात मोठी खळबळ माजली होती. सुशांतच्या मृत्यूला दोन वर्ष उलटून गेली असली तरी आजही त्याचे चाहते त्याच्यावर प्रेम करतात.