छोट्या पडद्यावरुन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत सुशांत सिंग राजपूतने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिलं. मग ते अंकिता लोखंडेसोबतचं अफेअर असो किंवा क्रिती सनॉनसोबत लिंकअप. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या पहिल्या अफेअरविषयी खुलासा केला.

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, ‘मी खूप निरुत्साही होतो म्हणून माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडने मला सोडलं. तेव्हापासून मी माझ्या स्वभावात बदल करण्याचा प्रयत्न करतोय.’ या मुलाखतीत क्रितीसोबत लिंकअपच्या बातम्यांवरही सुशांतने वक्तव्य केलं. ‘काही वेळा खोट्या गोष्टींना गंभीरप्रकारे मांडलं गेलं. अनेक गैरसमज पसरवले गेले. एक अभिनेता म्हणून मी या गोष्टींना दुर्लक्ष करु शकतो. अशा बातम्यांचा माझ्यावर परिणाम होतो मात्र सहकलाकारांसोबत असलेल्या मैत्रीच्या नात्यावर मी फरक पडू देत नाही,’ असं त्याने म्हटलं.

https://www.instagram.com/p/BXsponSASer/

अनेकदा सुशांतच्या रागाचा पारा चढल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर एका कार चालकाला शिवीगाळ केल्याच्या घटनेवरुन सुशांत चर्चेत होता. यावरही प्रश्न विचारले असता तो म्हणाला की, ‘मी इथे काहीही सिद्ध करण्यासाठी नाही आलोय. नंबर वनच्या स्पर्धेत मी नाहीच. मी भविष्याचा फार काही विचार करत नाही आणि काहीच लपवत नसून प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करण्याचा प्रयत्नही करत नाही.’

https://www.instagram.com/p/BXh7_0UAXZJ/

वाचा : ‘या’ तरुणीने चक्क जस्टीन बिबरला नाकारलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुशांत आणि क्रितीचा ‘राबता’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, पण बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने विशेष कामगिरी केली नाही. सध्या सुशांत आगामी ‘चंदा मामा दूर के’ चित्रपटासाठी जोरदार तयारी करताना दिसतोय. यामध्ये तो अंतराळवीराची भूमिका साकारणार असून त्यासाठी त्याने नासामध्ये प्रशिक्षणही घेतलं.