बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आणि आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप या दोघींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबईतला आहे. पाऊस आल्यानंतर त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरची चिंता न करता स्वत: छत्री घेऊन गेल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आले आहे.

त्यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या दोघींना मुंबईत एकाच ठिकाणी पाहिलं आहे. या व्हिडीओत सुरुवातीला सुझान तिच्या गाडीतून उतरताना दिसते आणि पाऊस येत असल्याने तिचा ड्रायव्हर लगेच पळत येऊन तिला छत्री देतो. सुझान तिच्या ड्रायव्हरची चिंता न करता छत्री घेऊन निघून जाते. त्यानंतर तहिरा तिच्या गाडीतून उतरताना दिसते. ती देखील ड्रायव्हरकडून छत्री घेते आणि त्याचा विचार न करता पुढे निघून येते.

आणखी वाचा : ‘तुला लाज वाटायला हवी, तू मुस्लीम आहेस’, कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने सारा झाली ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा : ‘मुस्लीम आहेस तू’, या आधी देखील हिंदू मंदिरात गेल्यामुळे सारा अली खान झाली होती ट्रोल

sussanne_khan_tahira_kashyap_got_trolled
सुझान खान आणि ताहिराला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

व्हिडीओमध्ये त्या दोघींच असं वागणं पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘माणूसकी आहे की नाही?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हास्यास्पद, असंवेदनशील, त्यांनी छत्री घेतली आणि दुसर्‍या व्यक्तीला भिजण्यासाठी राहू दिले.’ तर एका नेटकऱ्यांना त्यांच्या चाहत्यांना सुनावले आहे. नेटकरी म्हणाला, ‘हे असे लोक आहेत ज्यांचे आपण समर्थन करतो आणि त्यांना श्रीमंत बनवतो.’

Story img Loader