कंगनाविरुद्धच्या वादात माजी पत्नी सुझान ही ह्रतिक रोशनच्या मदतीला धावून आली आहे. ह्रतिक आणि कंगनाचे व्हायरल झालेले छायाचित्र फोटोशॉपच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याचे सांगत तिने ह्रतिकला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. सुझानने ट्विटरवरून याबद्दल सांगताना पुराव्यासाठी स्वत:चे आणि ह्रतिकचे एक छायाचित्रही शेअर केले आहे. व्हायरल झालेले छायाचित्र फोटोशॉप करण्यात आले असून याप्रकरणात खोट्या गोष्टींना अकारण महत्त्व देण्यात येत असल्याचे सुझानने सांगितले.


नुकतेच हृतिक आणि कंगनाचे एक छायाचित्र सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्याने चर्चा रंगली होती. सुरूवातीला हे छायाचित्र ‘क्रिश थ्री’चे शूटींग संपल्यानंतरच्या पार्टीतील असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, नव्या माहितीनुसार या छायाचित्रात काही फेरफार करण्यात आल्याची शक्यता आहे. याशिवाय, हे छायाचित्र अर्जून रामपालने २०१० साली दिलेल्या एका पार्टीतील असल्याची नवी माहितीही पुढे आली आहे.

Story img Loader